ठिबक व तुषार सिंचनचे अनुदान करा:-संभाजी ब्रिगेड

34

🔹मागणी मान्य न करा अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकू- राहुल गोडसे

✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)मो:-8080942185

केज(दि.13जानेवारी):-केज तालुक्यातील शेतकऱ्यांचे ठिबक व तुषार सिंचनची मागील वर्षी दुष्काळ परिस्थिती असल्याने शेतकरी वर्गातून मोठया प्रमाणात मागणी झाली आणि शेतकऱ्यांनि ते खरेदी देखील केले परंतु एक वर्ष उलटून गेले तरी देखिल अनुदान मिळालेले नाही शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान अदा करण्यात यावे या मागणीसाठी केज तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना संभाजी ब्रिगेड च्या वतीने निवेदन देण्यात आले.मागील वर्षी दुष्काळ असल्याने थोड्याशा पाण्यावर काहीतरी शेती करता येईल या हेतूने भरपूर प्रमाणात ठिबक व तुषारची खरेदी शेतकऱ्यांनी केली परंतु त्यांना अद्यापही मिळणारे अनुदान मिळालेले नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील मशागतीसाठी आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे तसेच चालू वर्षातही शेतकऱ्यांना ऊस,केळी, हळद,डाळींब तसेच फळबाग लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात ठिबक ची गरज असून शेतकऱ्यांना त्यासाठी आवश्यक ती कारवाई व पाठपुरावा करून अनुदान उपलब्ध करून द्यावे अन्यथा येत्या आठ दिवसांत तालुका कृषी कार्यालयास संभाजी ब्रिगेड च्या वतीने टाळे ठोक आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे निवेदनावर संभाजी ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष राहुल खोडसे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष संदीप शितोळे,संघटक अमरजीत धपाटे,व्ही बी व्ही पी जिल्हध्यक्ष योगेश अंबाड,विशाल देशमुख, जयराम देशमुख,प्रवीण धपाटे,विशाल साखरे,शुभम चौधरी आदींच्या स्वाक्षरी आहेत.