विश्वासराव मोहिते यांचा राज्य शासनाचे अधिस्वीकृती पत्रकार मध्ये समावेश

28

✒️कराड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कराड(दि.16जानेवारी):-महाराष्ट्र शासनाचे माहिती व जनसंपर्क महासंचालयन विभागाने तिरंगा रक्षक चे संपादक विश्वासराव मोहिते यांचा अधिस्वीकृती पत्रिका धारक पत्रकार म्हणून यादीत समावेश केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

पाडळी केसे (तालुका कराड) छोट्याशा खेडेगावातून पत्रकारिता चालू करून विविध दैनिक मध्ये निर्भिड पत्रकार म्हणून आपली ओळख निर्माण करणारे कष्टकरी, शेतकरी बहुजनांचा बुलंद आवाज,तिरंगा रक्षकचे संपादक, अखिल महाराष्ट्र बहुजन पत्रकार न्याय हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष विश्वासराव मोहिते यांना राज्यशासनाची “अधिस्वीकृती'” जाहीर झाल्याबद्दल शिवसेना कराड तालुक्याच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला, यावेळी शिवसेना कराड तालुका प्रमुख नितीनजी काशीद, उपतालुका प्रमुख संजय चव्हाण,उपतालुका काकासो जाधव, विभागप्रमुख प्रविण लोहार, पंकज जाधव, तानाजी साठे व इतर शिवसैनिक उपस्थित होते.
—––———————–
आमचे मित्र मा.विश्वासराव मोहिते यांना अधिस्वीकृती पत्रकार म्हणून मान्यता मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन

-सुरेश डांगे
संपादक
साप्ताहिक पुरोगामी संदेश
चिमूर/चंद्रपूर
मो.8605592830

💐💐💐