पत्रकार खाजामिया पठाण करणार अंबाजोगाई येथे होणाऱ्या किसान बाग आंदोलनाचे नेतृत्व

30

🔹शाहिनबागच्या धर्तीवर महाराष्ट्रातही वंचित बहुजन आघाडी करणार किसानबाग आंदोलन

✒️नवनाथ पौळ(अंबाजोगाई विभाग विशेष प्रतिनिधी)मो:-8080942185

अंबेजोगाई(दि.23जानेवारी):-दिल्लीच्या सिमेवर चालू असलेल्या शेतकऱ्यांचा आंदोलनाला महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाचा पाठिंबा दर्शविण्यासाठी शाहीनबागच्या धर्तीवर किसानबाग आंदोलनाचा प्रचार जनतेत जाऊन, प्रत्यक्ष भेट देऊन सुरू आंदोलनाचे नियोजन करण्यात आले आहे.

दिल्ली येथे 52 दिवस पेक्षा जास्त दिवस शीख समुदायाच्या किसान आंदोलनाला पाठिंबा म्हणून महाराष्ट्रात मुस्लिम समाजाचे किसान बाग आंदोलन अंबाजोगाई किसान बागच नेतृत्व म्हणून मुस्लिम समाजाचे अभ्यासू कर्तव्यदक्ष महाराष्ट्र मोटर्सचे संचालक खाजामियाँ पठाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.गेली 52 दिवस पेक्षा जास्त दिवसापासून भर थंडीत दिल्ली येथे शेतकऱ्यांनी कृषी कायद्या विरोधात एल्गार पुकारला या आंदोलनात शेकडो आंदोलकांचे बळी सरकारकडून घेण्यात आले . मुस्लिम समाजाने CAA , NRC वेळी दिल्ली येथे शाहीनबाग आंदोलन उभे केले त्यावेळी देशातील धर्मांध देशविघातक संघ शक्तींनी मुस्लिम समाजावर शांततेने आंदोलन करत असलेल्या आंदोलकांवर गोळीबार केला.

यंत्रणेचा वापर करत देशातील मुस्लिमांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न केला . या संघशक्ती अजूनही मुस्लिमांना आतंकवादी देशाच्या बाहेरचे जिहादी वगैरे ठरवून इतर समूहांना मुस्लिम विरोधी बनवत आहेत . दिल्लीत शेतकरी आंदोलनात पंजाब हरियाणातील बहुतेक शीख समुदाय ताकदीने उभा आहे . हा तोच शीख समुदाय ज्या समुदायाने या संघशक्तीविरोधात दिल्लीतील शाहीनबाग येथे हत्यार बंद उभे राहून मुस्लिमांच्या केसाला कोणी धक्का जरी लावला तर आम्ही रक्त सांडू असा एल्गार पुकारत जाहीर शाहीनबाग चे संरक्षण केले. त्या शिखांसाठी, देशातील शेतकऱ्यांसाठी मुस्लिम समाजाला संरक्षनासाठी उभं राहण्यासाठी 27 जानेवारी 2021 रोजी वंचित बहुजन आघाडी मार्फत महाराष्ट्रात ठिकठिकाणी शाहीन बागच्या धर्तीवर किसान बाग आंदोलन करण्यात आले.

असून या आंदोलनासाठी सर्वानुमते दैनिक कार्यरंभचे पत्रकार , सत्य मराठी वेब पोर्टलचे संपादक , महाराष्ट्र मोटर्सचे संचालक तसेच वेळोवेळी मुस्लिम समाज तसेच वंचित बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी गेली कित्येक वर्षे सातत्य राखत निडरपणे लढणारे अंबाजोगाई तालुक्याचे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते खाजामियाँ पठाण यांची अनिलजी डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेनुसार सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे.
27 जानेवारी 2021 रोजी सकाळी 9:00 ते 5:00 या वेळेत किसान बाग आंदोलनासाठी सज्ज असावे असे आवाहन बीड जिल्हा अध्यक्ष अनिलभाऊ डोंगरे व अंबाजोगाई तालुकाअध्यक्ष संजयजी तेलंग यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.