महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत ब्रम्हपुरी शहर पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन

26

🔸मा.ना.विजय वाडेट्टीवार यांचे हस्ते

🔹ब्रम्हपुरी शहराची शैक्षणिक व मेडीकल हब अशी ओळख बनवणार

✒️रोशन मदनकर(उप संपादक):-8888628986

ब्रम्हपुरी(दि.23जानेवारी):- ब्रम्हपुरी शहराची वाढती लोकसंख्या लक्ष्यात घेता पुढील 30 वर्षे ब्रम्हपुरी वासियांना पाण्याची टंचाई भासू नये या उदांत हेतूने ब्रम्हपुरी नगर परिषदेच्या वतीने सुवर्ण जयंती, नगरोत्थान महा अभियान अंतर्गत, ब्रह्मपुरी शहर पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन दिनांक 22 जानेवारी, शुक्रवारला बहुजन कल्याण तथा मदत व पुनर्वसन मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री विजय भाऊ वडेट्टीवार यांच्या शुभ हस्ते पार पडले. उद्घाटनाप्रसंगी नामदार विजय वडेट्टीवार यांनी विविध विकास कामांना मंजुरी मिळाली असून ब्रह्मपुरी शहराचा कायापालट येत्या तीन वर्षात होणार असून येत्या काळात आयुर्वेदिक महाविद्यालय, व दर्जेदार शिक्षणाची सोय करून ब्रम्हपुरी शहराची शैक्षणिक व मेडीकल हब अशी ओळख बनवणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत,पुनर्वसन, बहुजन कल्याण मंत्री, तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. विजय वडेट्टीवार यांनी केले.

यावेळी त्यांनी सांगितले तसेच ब्रह्मपुरी येथील रेल्वे उड्डाणपुलासाठी 75 कोटी कोटी रुपयाचा निधी निधीची मागणी सरकारकडे केली असून लवकरच त्याला मंजुरी येणार असल्याचे उद्घाटनाप्रसंगी सांगितले.यावेळी प्रमुख अथिती म्हणून नगराध्यक्षा सौ. रिता ताई उराडे, उपाध्यक्ष अशोक रामटेके, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे , मुख्याधिकारी मंगेश वासेकर, बांधकाम सभापती विलास विखार, नगरसेवक ऍड दीपक शुकला, नगरसेवक प्रीतेश भूरले, नगरसेविका श्रीमती नीलिमा सावरकर,नगरसेवक मनोज वठे नगरसेवक नितीन उराडे नगरसेवक महेश भर्रे , नगरसेवक हीतेंद्र राऊत प्रमुख उपस्थिती होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आरोग्य निरीक्षक आर.एस. ठोंबरे यांनी केले.