पित्यासह मुलीचा दुर्दैवी मृत्यू

27

🔺लोकांमध्ये हळहळ

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.24जानेवारी):-मकवान भरून घेऊन जाणारा छोटा हत्ती कॅनोलपट्टीमध्ये पडून चालक पित्यासह मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना माळेगाव मिटकलवाडी कॅनोलमध्ये दि.२४ रोजी सकाळी ९.३० वा सुमारास घडली. तात्यासाहेब बाळासाहेब कोळी(माने) वय २८ व आरती तात्यासाहेब कोळी(माने) वय ७ दोघे रा.मिटकलवाडी हल्ली मानेगाव ता.माढा असे यातील मृतांची नावे आहेत.

याबाबत नागनाथ भिकाजी कोळी वय ४८ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तात्यासाहेब बाळासाहेब कोळी हा त्याचा छोटा हत्ती एम एच ४५ टी ०३१२ मध्ये मकवान भरून सोबत त्याची मुलगी आरती तात्यासाहेब कोळी हिला घेऊन मालेगाव मिटकलवाडी कॅनोलपट्टीने त्याच्या छोटा हत्ती रस्त्याची परिस्थिती न पहाता भरधाव वेगात अविचाराने चालवून रोडच्या डाव्या साईडला असलेल्या कॅमिलो पट्टीमध्ये पडून स्वतःच्या व मुलीच्या मरणास कारणीभूत ठरला असून चालक मयत तात्यासाहेब कोळी याच्यावर टेंभुर्णी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पो उपनिरीक्षक काशीद हे करीत आहेत