देगलूर येथे शेतकऱ्यांचा चक्का जाम आंदोलन यशस्वी

    49

    ?नांदेड-हैद्राबाद राज्यमार्ग दोन तासासाठी केले वाहतूक बंद

    ✒️देगलूर प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

    देगलूर(दि7फेब्रुवारी):-दिल्ली येथील किसान आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आज देगलूर येथे नांदेड-हैद्राबाद राज्य महामार्गावर सलग दोन तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले. शेतकरी विरोधी तिन्ही काळे कायदे तात्काळ रद्द करा, शेतमाल हमीभाव कायदा लागू करा व शेतकरी विकासाचे धोरणे राबवा या मागण्या प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या वतीने मांडण्यात आल्या.

    मागील 74 दिवसांपासून दिल्ली येथे चालू असलेल्या किसान आंदोलनाने संपूर्ण देशभर चक्का जाम आंदोलनाची हाक दिली. त्याला प्रतिसाद देत आज देगलूर येथील शेतकरी व विविध पक्ष संघटनांनी पुढाकार घेऊन नांदेड-हैद्राबाद राज्य महामार्ग सलग तीन तास बंद करत शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला. शेतकरी विरोधी तिन्ही कायदे तात्काळ रद्द करा, शेतमाल हमीभाव कायदा लागू करा अन्यथा खुर्च्या खाली करा या घोषणांनी परिसर दणाणून सोडले.

    यावेळी अँड. मोहसीन अली, शिवसेनेचे तालुकाप्रमुख महेश पाटील, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख कैलास येसगे कावळगावकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाप्रमुख श्याम पाटील, काँग्रेसचे दिपक शहाणे, डाँ. उत्तम इंगोले, सय्यद बासिद, पँथर विकास नरबागे, शेतकरी संघटनेचे बलभीम पाटील मरतोळीकर, राजू जाधव लच्छनकर यांनी मनोगत मांडले.

    यावेळी युवासेनेचे संतोष पाटील, शहरप्रमुख बालाजी मैलागिरे, संजय जोशी, बाबुराव मिनकीकर, नवीद अंजुम, धुंदी रज्जाक शेख, बबलू उल्लेवार, विनोद सोनकांबळे, मष्णाजी पैलवार, संतोष कांबळे, प्रहार जनशक्ती पक्षाचे दिपक रेड्डी, भरत पाटील, वैभव पाटील, सुरज पाटील मलकापूरकर, माधव आवळे, लक्ष्मण सुनपे, चंद्रकांत गज्जलवार, गंगाधर आऊलवार, संजय गवलवाड, प्रहार दिव्यांग संघटनेचे संगमेश्वर पोसाने, बालाजी दासरवाड व शेतकरी अन् तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते.