धुळे जिल्हा परिषदेच्या 15 तर पंचायत समितीच्या 30 जागाच्या आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने दिला निकाल

28

🔸सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

🔹शिवसेना, काँग्रेस व भाजपा ला जिल्हा परिषदेत धक्का

✒️जयदीप लौखे-मराठे,वेल्हाणे(धुळे प्रतिनिधी)

धुळे(दि.4मार्च):-धुळे जिल्हा परिषदेच्या 15 तर पंचायत समितीच्या 30 जागांसाठी आरक्षण निहाय निकाल न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जाहीर केला. व दोन आठवड्यात आरक्षण देऊन या जिल्हा परिषदेच्या 15 व पंचायत समितीच्या 30 जागांसाठी निवडणूक घेण्याचे आदेश न्यायालयाने जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना दिले.

या निकालानंतर इतर मागासवर्गीय प्रवर्गातून निवडून आलेल्या जिल्हा परिषदेच्या 15 तर पंचायत समितीच्या 30 सदस्यांवर न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने टांगती तलवार दाखवली आहे.या निकालानंतर धुळे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य व धुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हादरल्याचे चित्र दिसून आले.या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा.भैय्यासाहेब किरण गुलाबराव पाटील यांचा कार्यालयाबाहेर माजी आ.प्रा.शरद पाटील, सुनील नेरकर, प्रभाकर भदाणे यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी जल्लोष करत एकमेकांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला.जिल्हा परिषदेच्या आवारात या निकालानंतर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते पोपटराव सोनवणे यांच्यासह जिल्हा परिषदेतील अनेक सदस्य व कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर जल्लोष साजरा केला.

न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिकाकर्ते प्रकाश धुडकु भदाणे रा.बोरकुंड ता.जि.धुळे यांनी याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने काल सुनावणी देऊन धुळे जिल्हा परिषदेच्या 15 सदस्यांना आज रोजी इतर मागासवर्गीय आरक्षण असलेल्या जागा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.या निकालानंतर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये “कही खुशी तो कही गम” असे वातावरण दिसुन आले.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या ज्या जागा रद्द होणार आहे, त्यात जिल्हा परिषदेच्या 15 जागा असून त्यात भाजपच्या 11, शिवसेनेच्या 02, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 02 जागा आहेत.आज रोजी जिल्हा परिषदेत भाजपाची सदस्य संख्या 39 असून त्यांनी बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली होती या निकालानंतर भाजपाचा बुरुज ढासळतो की काय याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.याचिकाकर्ते प्रकाश धुडकु भदाने यानी व किरण पाटील यांनी या निकालानंतर न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आभार व्यक्त करत जल्लोष साजरा केला.