लक्ष्मीकांत येपूरवार व सर्पमित्र विजय गुप्ता यांचा सत्कार

    33

    ✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

    बिलोली(दि.12मार्च):-तालुक्यातील कुंडलवाडी येथील भुमिपूत्र लक्ष्मीकांत येपूरवार यांची कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सचिवपदी निवड झाल्याने तसेच सर्पमित्र विजय गुप्ता यांचा सेवानिवृत्त प्रा.जयप्रकाश कमटलवार मित्र मंडळाच्या वतीने महाशिवरात्रीचे औचित्य साधून दिनांक 11/3/2021 रोजी साईनाथ कत्रुवार यांच्या कार्यालयात छोटेखानी कार्यक्रमांच्यानिमित्त लक्ष्मीकांत येपूरवार यांचा शाल श्रीफळ व हार घालुन सत्कार करण्यात आला.

    तर व सर्पमित्र विजय गुप्ता यांना अकराशे रूपयांचा धनादेश व शाल श्रीफळ हार देऊन सत्कार करण्यात आला आहे.यावेळी सेवानिवृत्त प्रा.जयप्रकाश कमटलवार,एन.जी.वाघमोडे,प्रतिष्ठीत व्यापारी गणेश उत्तरवार,पत्रकार गणेश कत्रुवार,अशोक हाके,राजेश्वर कोलंबरे,मकरंद मठ्ठमवार,दतु शिवशेट्टे,गंगाधर झंपलकर,साईनाथ कत्रुवार,साईनाथ गांजरे,आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रा.जयप्रकाश कमटलवार यांनी मानले