वेल्हाणे गावात भगवान वीर महादंडनायक एकलव्य यांची जयंती साजरी

28

✒️जयदीप लौखे-मराठे,वेल्हाणे(धुळे प्रतिनिधी)

वेल्हाणे(दि.12मार्च):- धुळे तालुक्यातील वेल्हाणे येथे भिल्ल योद्धा, राजपुत्र, भगवान वीर महादंडनायक एकलव्य यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी वेल्हाणे गावाचे नवनिर्वाचित सरपंच शितलताई पाटील, माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अण्णाभाऊ मराठे, शिवसेना विभाग प्रमुख राजेंद्र माळी, माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पवार, ग्रामपंचायत सदस्य पुंडलिक सोनवणे, अलकाबाई सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते बारकु सोनवणे, सुरेश सोनवणे, वाल्मीक सोनवणे, छोटू पाटील व सर्व आदिवासी बांधव आणि वेल्हाणेकर ग्रामस्थ उपस्थित होते.