म्हसदी येथे महाशिवरात्री निमित्त गावात महाप्रसाद वाटप

27

✒️संजय कोळी(धुळे जिल्हा,प्रतिनिधी)मो:-9075716526

धुळे(दि.12मार्च):-म्हसदी येथील महाशिवरात्री निमित्त विश्वेशवर महादेव मंदिरात कार्यक्रम करणयात आला. एक किविटल साबुदाणा व ६१ लीटर दूधाचा महाप्रसाद वाटप करण्यात आला. गावातील दानशूर व्यक्तिमत्व सतत समाजकार्यात हातभार लावणारे गावातील गणू महाराज यांनी महाशिवरात्रीच्या निमित्ताने महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

तिथे सर्व गावकरी सहभागी झाले होते विश्वेश्वर मंदिरातील गावातील तरुण मंडळाने ही सहभागी घेतला होते. सकाळी साडेआठ वाजता महाराजांच्या हाती मंदिर मध्ये पूजा झाली व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी साक्री तालुक्यातील आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते प्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी गावातील सर्व मान्यवर व तरुण मित्र मंडळ ने सहभागी घेतला होता.