यशवंत पवार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

32

✒️पारोळा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पारोळा(दि.12मार्च):– येथील यशवंत धर्मराज पवार (तामसवाडी) प्राथमिक शिक्षक देवगाव बॉईज यांना शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन जळगाव या आय.एस.ओ. मानांकन प्राप्त संस्थेमार्फत राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, तामसवाडी गावाचे सुपुत्र व देवगाव जिल्हा परिषद शाळेतील उपशिक्षक यशवंत धर्मराज पाटील यांना शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशन जळगाव या संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष शिवचरण उज्जैनकर यांनी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केला असून याबाबतचे लेखी पत्र यशवंत पवार यांना आजच प्राप्त झाले. त्यांना हा पुरस्कार विविध मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर समारंभात देऊन गौरविण्यात येणारआहे.

यशवंत पवार सरांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबाबतचे वृत्त समजताच पारोळा एरंडोल विधानसभा मतदासंघाचे आमदार चिमणराव पाटील, अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिलदादा पाटील, माजी आमदार स्मिताताई वाघ, तामसवाडीचे विद्यमान सरपंच समीरदादा पाटील आई विद्यादेवी पाटील व काका वसंतराव पाटील माजी पं. स. सभापती पारोळा, पारोळा पं. स. चे गटशिक्षण अधिकारी कविताजी सुर्वे, शिक्षणविस्तार अधिकारी सि. एम. चौधरी, केंद्रप्रमुख एच. एस. पवार आदी मान्यवरांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.