?महाविकास आघाडीच्या नेत्याच्या डोक्यात घुसली सत्तेची नशा
✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)
सोलापूर(दि.22मार्च):-जसे इतरांवर गुन्हे दाखल झाले तसेचं पंढरपूर येथे झालेल्या मेळाव्यात हजर असणाऱ्या प्रत्येक व्यक्ती वर गुन्हा दाखल होणार असेल तरच हे या राज्यात कायदा व सुव्यवस्था सर्वांना सारखा आहे. असे म्हणता येईल.
शेतकऱ्यांची वीज कट करुन शेतकरी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलाअसता, त्यावर गुन्हे दाखल करुन रुबाबात मिरवत कार्यक्रम घेणा-या महाविकास आघाडी सरकारचा जाहीर कार्यक्रम पंढरपूर येथे झाला.
सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळत ५० लोकांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा आज पंढरपूर येथे पार पडला. शेतकऱ्यांसाठी आंदोलन घ्यायचं म्हटलं तर प्रशासनाच्या अधिकारी सांगतात covid-19
आचार संहिता अशा मुद्द्यावर परवानगी देत नाहीत.