महावितरण मार्फत होणारी सक्तीची विजबिल वसुली थांबवा ; मुख्यमंत्र्यांना निवेदन

31

✒️उमरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

उमरी(दि.24मार्च):- सध्या राज्यात कोरोना रोगाने कहर घातला असुन दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत. यावर उपाय म्हणून लाॅकडाउन घोषित करणे चालु झाले आहे जर लाॅकडाउन असेल तर लोक कामे कसे करतील ….? जर उद्यागधंदे च बंद असतील जनतेकडे पैसा कसा येईल…..? हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारत तत्काळ विजबिल वसुली थांबवण्याचे आदेश काढावेत असे निवदनाद्वारे विनंती करण्यात आली आहे.गेल्या वर्ष भरापासून राज्यातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना महामारीचा कहर सुरू आहे.या जागतिक महामारीने एकूण अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे.

परिणामी शेतकरी आणि सर्वसामान्य लोक आर्थिक संकटात सापडले आहेत. मागील वर्षी कोरोना महामारीमुळे शेतकऱ्याला उभी पिकं बाजारात विकता आली नाही. विक्रीसाठी आलेला द्राक्ष,डाळिंब, कांदा,टमाटा यासारख्या सर्व पिकांवर शेतकऱ्यांना पाणी सोडावे लागले त्यामुळे घेतलेले कर्ज सुध्दा शेतकऱ्याला फेडता आले नाही, दुसऱ्या बाजूला सरकारने कुठलीही आर्थिक मदत शेतकऱ्यांना देऊ केली नाही.राज्यामध्ये शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे शेतकऱ्याने पिकवलं तरच सर्वसामान्य माणूस खाऊ शकतो राज्याची आर्थिक घडी ही सर्वस्वी शेतकऱ्याच्या भरोवशावर असताना त्या शेतकऱ्यांबाबत कायम दुजा भाव केला जात आहे.या काळात सरकारने वीज बिल भरू नका म्हणून शेतकऱ्यांना आवाहन केले त्यावेळी राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनीही त्यास पाठिंबा जाहीर केला होता.

आज त्यांच्या व आपल्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार शेतकऱ्याला अव्वाच्या सव्वा बिले पाठवून वीज बिले भरण्याची सक्ती करत आहेत व जे शेतकरी व नागरिक वीज बिल भरणार नाहीत,त्यांची तात्काळ वीज खंडित करावी असा अध्यादेश महावितरण ने काढलेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. साहेब आपण बाळासाहेबांचे पुत्र असून शेतकऱ्यां प्रति बाळासाहेबांची असलेली भावना आपण जवळून बघितली आहे व आपणही राज्यभर शेतकऱ्यांसाठी दौरे काढून शेतकऱ्यांना धीर दिलेला आहे त्यामुळे यावेळी वीज बिलाच्या संदर्भात सुद्धा आपल्या कडून देखील पूर्वी प्रमाणे राज्यातील शेतकरी अपेक्षा करत आहे आणि ती पूर्ण करण्याची आम्हाला खात्री आहे.
शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहायचे सोडून शेतकऱ्याला मृत्यूच्या खाईत ढकलण्याचं काम सध्याचे आपल्या सरकारमधील काही मंत्री करीत आहे.

म्हणून आपल्या सरकारला व सरकारमधील सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे की आपण आपले राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा व त्यांना या संकटात मदत करा. वाढीव दिलेली वीजबिले कमी करा व ती बिले भरण्यासाठी शेतकऱ्याला वाढीव मुदत द्या अन्यथा आपल्या या मंत्र्यांच्या कृतीचा शेतकऱ्यांच्या जीवनावर विपरीत परिणाम होऊन शेतकरी या त्यास विरोधा रस्त्यावर उतरला तर या सरकारला ते परवडणारे नसेल.तरी छावा क्रांतीवीर सेनेच्यावतीने आपणास आज आम्ही निवेदनाच्या माध्यमातून विनंती करत आहोत की वीजबिल थकीत शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्या अन्यथा राज्यभर आपल्या विरोधात मोठे जनआंदोलन उभे करण्यात येईल व त्यानंतर होणाऱ्या सर्व परिणामास सर्वस्वी आपले सरकार व प्रशासन जबाबदार असेल.
यावेळी छावा क्रांतिवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील ढगे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष विलास लोहगावे, योगेश पाटील मोरे,विजय पाटील कदम,अरुण पाटील हंबर्डे,राजेश पाटील मोरे,प्रतिकेत पाटील जाधव,कैलास पाटील ईज्जतगावकर,माधव पाटील ढगे यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते