चंद्रपूर जिल्ह्यात (दि.3एप्रिल) रोजी 24 तासात 191 कोरोनामुक्त 335 कोरोना पॉझिटिव्ह – एक कोरोना बधिताचा मृत्यू

32

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.3एप्रिल):- जिल्ह्यात मागील 24 तासात 191 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 335 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधीतांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 28 हजार 742 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 25 हजार 760 झाली आहे. सध्या 2550 बाधितांवर उपचार सुरू आहेत.

आतापर्यंत दोन लाख 79 हजार 590 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 47 हजार 503 नमुने निगेटीव्ह आले आहेत.आज मृत झालेल्यामध्ये तुकुम, चंद्रपूर येथील 61 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 432 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 392, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 335 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 124, चंद्रपूर तालुका 27, बल्लारपूर 18, भद्रावती सहा, ब्रम्हपुरी 44, सिंदेवाही 16, मूल सहा, सावली एक, पोंभूर्णा एक, राजूरा तीन, चिमूर 38, वरोरा 26, कोरपना 23 व इतर ठिकाणच्या दोन रुग्णांचा समावेश आहे.कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.