लोहारा तलाव खोलीकरण कामाला सुरुवात

32

🔸सरपंच सौ दीक्षा शैलेंद्र पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

✒️नितीन पाटील(विशेष प्रतिनिधी)

नेरी(दि 8एप्रिल):- वरून जवळ असलेल्या लोहारा येथे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत लोहारा येथील गावाजवळ आणि शेती परिसरात लागून असलेल्या तलावा च्या खोलीकरण कामाला सुरवात झाली असून लोहारा येथील सरपंच सौ दिक्षाताई शैलेंद्र पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करून आज दि 8 एप्रिल ला कामाला सुरुवात करण्यात आली,या कामामुळे तलावा लगत लागून असलेल्या शेतीच्या पाण्याची पातळी वाढ होईल.जंगल लागून असल्यामुळे प्राणी पक्षी यांना फायदा होईल.

शिवारात पाण्याची पुरेशी उपलब्धता असावी यासाठी तलावाचे खोलीकरण करण्यात येत आहे तसेच पाणी हे पुर्न उन्हाळ्याभर राहीला पाहिजे आणि जंगली प्राण्यांची तहान भागली पाहिजे हाही उद्देश ठेवून हा खोलीकरनाचे काम केले जात आहे .सदर काम हे कोरोना चे शासकीय नियम पाळून केले जात आहे.

यात सर्व मजूर नागरिक सामाजिक अंतर ठेवून काम करीत आहेत आणि स्वतःची काळजी स्वतः घेत असून रोजगारासाठी काम करीत आहेत सध्या संपुर्ण जिल्ह्यात मिनी लाकडाऊन सुरू असून सर्व कामकाज ठप्प झाले आहे आणि ग्रामीण क्षेत्रात मजुरांना काम नाही रिकामे असल्यामुळे या कोरोनाच्या अडचणीचे काळात कामाला सुरवात झाल्यामुळे मजुरांना काम मिळाले असल्यामुळे गावात ग्रा प च्या कार्यावर आनंदी दिसत आहेत .सरपंच दिक्षाताई पाटील यांनी मजुरांशी बोलताना सांगितले की अशी बहुविध कामे केली जातिल आणि गावातील मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिले जाईल यावेळी भूमिपूजन कार्यक्रम ला उपसरपंच गीताताई जाभूळे ,ज्ञानेंद्रिताई घुगुस्कार, हरिभाऊ डुंमरे सर्व ग्रा प सदस्यगण ईश्वर दहिवले रोजगार सेवक ग्राम पंचायत कर्मचारी वर्ग, गावातील अनेक मजूरांची उपस्थिती होती.