चंद्रपूर जिल्ह्यात (दि.16एप्रिल) रोजी 24 तासात 392 कोरोनामुक्त 1135 कोरोना पॉझिटिव्ह – सात कोरोना बधितांचा मृत्यू

38

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.16एप्रिल):-जिल्ह्यात मागील 24 तासात 392 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1135 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून सात बाधीतांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 39 हजार 54 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 29 हजार 554 झाली आहे. सध्या 8948 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 20 हजार 367 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 74 हजार 986 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये घुग्गुस येथील 66 वर्षीय पुरुष, राजोली मुल येथील 53 वर्षीय पुरुष, विकास नगर वरोरा येथील 86 वर्षीय पुरुष, दडमल वार्ड चंद्रपूर येथील 59 वर्षीय पुरुष, नगीना बाग चंद्रपुर येथील 43 वर्षीय महिला, गजानन महाराज चौक चंद्रपूर येथील 47 वर्षीय पुरुष, न्यू पटोले नगर येथील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 552 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 505, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 21, यवतमाळ 20, भंडारा एक, गोंदिया एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आलेल्या 1135 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 463, चंद्रपूर तालुका 58, बल्लारपूर 81, भद्रावती 107, ब्रम्हपुरी 118, नागभिड 37, सिंदेवाही सात, मूल 26, सावली चार, पोंभूर्णा तीन, गोंडपिपरी सहा, राजूरा 25, चिमूर चार, वरोरा 155, कोरपना 15, जीवती 11 व इतर ठिकाणच्या 15 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

🔺गडचिरोली जिल्ह्यात 11 मृत्यूसह आज(16 एप्रिल) 434 नवीन कोरोना बाधित तर 183 कोरोनामुक्त

 

गडचिरोली,(जिमाका)दि.16: आज जिल्हयात 434 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 183 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 14019 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 11249 वर पोहचली. तसेच सद्या 2585 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 185 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 11 नवीन मृत्यूमध्ये गडचिरोली तालुक्यातील कुरखेडा येथील 64 वर्षीय पुरुष, आरमोरी ता. कारागोटा 56 वर्षीय महिला, आरमोरी येथील 67 वर्षीय पुरुष , 71 वर्षीय पुरुष , धानोरा 52 वर्षीय पुरुष, चंद्रपूर ता. चिमूर येथील 72 वर्षीय पुरुष, चंद्रपूर ता. ब्रम्हपूरी 50 वर्षीय पुरुष, चंद्रपूर ता. सिदेवाही 61 वर्षीय पुरुष, चंद्रपूर ता. ब्रम्हपूरी 75 वर्षीय पुरुष, गोकूल नगर गडचिरोली 56 वर्षीय महिला, भंडारा ता. कुडेगांव 87 वर्षीय पुरुष, इ.चा मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 80.24 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 18.44 टक्के तर मृत्यू दर 1.32 टक्के झाला.

नवीन 434 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 165, अहेरी तालुक्यातील 68, आरमोरी 33, भामरागड तालुक्यातील 14, चामोर्शी तालुक्यातील 20, धानोरा तालुक्यातील 21, एटापल्ली तालुक्यातील 17, कोरची तालुक्यातील 12, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 17, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 04, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 09 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 42 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 183 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 75, अहेरी 14, आरमोरी 14, भामरागड 11, चामोर्शी 08, धानोरा 09, एटापल्ली 07, मुलचेरा 03, सिरोंचा 05, कोरची 04, कुरखेडा 06, तसेच वडसा 27 येथील जणाचा समावेश आहे. तर इतर जिल्हयातील बाधितामध्ये 12 जणांचा समावेश आहे.