परळी येथील अनन्या हॉस्पिटलमध्ये प्रा. बा आर.बनसोडे कोरोनाने घेतला अखेरचा श्वास

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

परळी(दि.20एप्रिल):- येथील जवाहरलाल नेहरू वरिष्ठ महाविद्यालयात प्रा. बाबाजी आ. बनसोडे पाली विभाग प्रमुख सेवेत होते. परळी येथील अनन्या हॉस्पिटलमध्ये गेली दहा ते पंधरा दिवसापासून उपचार घेत होते.आज दि.19/04/2021, सोमवार सकाळी रोजी प्रा. बा आर.बनसोडे कोरोनामुळे मृत्यू झाला असे डॉक्टरने घोषित केले.

परळी येथील जवाहरलाल नेहरू वरिष्ठ कला’ वाणिज्य’ विज्ञान,महाविद्यालय पाली विषयाचे प्रमुख.बाबाजी.आर.बनसोडे सर (नेट परीक्षा धारक) गेली कित्येक वर्षापासून ते या महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य करत होते.त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा/ एक मुलगी तेही दहा ते बारा वर्षाचे च लहान आहेत भाऊ व इतर नातेवाईक आहेत, त्यांच्या निधनाची बातमी कळताच परळी परिसरात सर्वत्र , शोकाकुल वातावरण पसरले होते.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED