यशवंत यांच्याकडून अनेक कुटुंब यांची उपासमार रोखण्याचा प्रयत्न

35

🔹जितेंद्र यशवंत यांचा दातृत्वाचा वसा आदर्शवत: अर्चना गुळवणे

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.27एप्रिल):-गेले वर्षभर कोरोना महामारीत लॉकडाऊन असल्यामुळे लोक घरीच बसून होते. परंतु, अत्यावश्यक सेवा पुरवणारे मात्र जीवाची बाजी लावून अखंडित सेवा पुरवीत होते. त्यातच काही नामांकित मंडळी या लोकांचे मनोधैर्य वाढविण्यात हातभार लावीत होती. काही अन्न वाटतं होती, काही औषधं तर, काही आर्थिक मदत पुरविण्यासाठी पुढे सरसावत होते.हातावरील पोट असणाऱ्या फिरून व्यवसाय करणाऱ्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली असून अशा गरीब आणि गरजू लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या चरितार्थाचा प्रश्न सोडविण्यासाठी गडमुडशिंगीच्या जितेंद्र यशवंत यांनी दानशूर वृत्ती दाखवत त्यांची माणुसकी अधोरेखित केली.याचा आदर्श सर्वानी घ्यावा असे आवाहन गडमुडशिंगी च्या मंडल अधिकारी अर्चना गुळवणी यांनी केले.त्या अन्नधान्य किटचे वाटप कार्यक्रमात बोलत होत्या.

यावेळी गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे राहणाऱ्या व गावोगावी फिरून घोळणे, चाळणी, सुया, कंगवा, फनी अशा व्यावसायिकांचा लाॅकडाऊन मुळे व्यवसाय बंद असल्याने त्यांच्या पोटापाण्याची आभाळ होत आहे. याची जाणीव झालेले गडमुडशिंगी गावचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र यशवंत यांनी या कुटुंबीयांना महिनाभर पुरेल इतके धान्यच्या किटचे वाटप केले. यावेळी गडमुडशिंगीचे ग्रामसेवक आर एन गाढवे, तलाठी आर बी भिऊंगडे ,संजय सोनुले आदी उपस्थित होते.

चौकट
माजी सरपंच जितेंद्र यशवंत वेळोवेळी गरीब आणि गरजूंच्या मदतीला धावून जात असून महापूर, अतिवृष्टी, कोरोना महामारी यासह गरीब आणि गरजू कुटुंबियांना गरज पडेल तेव्हा ते मदत करत असतात . गेली अनेक वर्ष त्यांनी हा वसा जपला आहे.