चंद्रपूर जिल्ह्यात (दि.4मे) रोजी 24 तासात 1092 कोरोनामुक्त, 1170 कोरोना पॉझिटिव्ह तर 22 कोरोना बधितांचा मृत्यू

31

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.4मे):-जिल्ह्यात मागील 24 तासात 1092 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1170 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 22 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 65 हजार 38 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 47 हजार 217 झाली आहे. सध्या 16 हजार 823 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 91 हजार 838 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 21 हजार 634 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील गजानन महाराज चौक परिसरातील 48 वर्षीय पुरुष, पठाणपुरा परिसरातील 50 वर्षीय पुरुष, गांधी चौक येथील 85 वर्षीय महिला, विठ्ठल मंदिर वार्ड परिसरातील 72 वर्षीय पुरुष, 47,50 व 62 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरुष.वरोरा तालुक्यातील अभ्यंकर वार्ड परिसरातील 55 वर्षीय पुरुष.50 वर्षीय पुरुष. भद्रावती तालुक्यातील गुरु नगर येथील 54 वर्षीय महिला. कोरपना तालुक्यातील 66 वर्षीय पुरुष. गोंडपिपरी तालुक्यातील सोमनपल्ली येथील 42 वर्षीय पुरुष. नागभीड तालुक्यातील तळोधी येथील 35 वर्षीय पुरुष, धामणगाव येथील 65 वर्षीय महिला. ब्रह्मपुरी तालुक्यातील नवरगाव येथील 37 वर्षीय पुरुष. सिंदेवाही तालुक्यातील 43 वर्षीय पुरुष. चिमूर तालुक्यातील कोलारी येथील 50 वर्षीय महिला, पाचगाव येथील 55 वर्षीय महिला, वडाला पैकु येथील 53 वर्षीय पुरुष, तर राजुरा तालुक्यातील रामपूर येथील 77 वर्षीय पुरुष. वणी-नायगाव येथील 26 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 998 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 925, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 29, यवतमाळ 29, भंडारा नऊ, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1170 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 461, चंद्रपूर तालुका 82, बल्लारपूर 42, भद्रावती 22, ब्रम्हपुरी 51, नागभिड 65, सिंदेवाही 77 , मूल 24, सावली 07, पोंभूर्णा 29, गोंडपिपरी 31, राजूरा 76, चिमूर 36, वरोरा 36, कोरपना 112, जिवती 02 व इतर ठिकाणच्या 17 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

🔺गडचिरोली जिल्ह्यात 627 कोरोनामुक्त तर 17 मृत्यूसह आज (4 मे) 516 नवीन कोरोना बाधित

गडचिरोली(दि.4मे):- आज जिल्हयात 516 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 627 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 23012 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 18287 वर पोहचली. तसेच सद्या 4260 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 465 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.

आज 17 नवीन मृत्यूमध्ये 36 वर्षीय पुरुष रामकृष्णपूर ता.चामोर्शी, 51 वर्षीय पुरुष जोगीसाखरा ता.आरमोरी , 68 वर्षीय महिला गडचिरोली , 38 वर्षीय पुरुष ता.अहेरी, 58 वर्षीय पुरुष ता.ब्रम्हपूरी जि.चंद्रपूर , 61 वर्षीय महिला अहेरी, 66 वर्षीय महिला वाघाडा बर्डी ता.आरमोरी, 40 वर्षीय पुरुष उमरी ता.चामोर्शी , 48 वर्षीय महिला गडचिरोली, 75 वर्षीय महिला नवेगाव गडचिरोली, 55 वर्षीय पुरुष विवेकानंद नगर गडचिरोली, 73 वर्षीय पुरुष सर्वोदय वार्ड गडचिरोली, 53 वर्षीय पुरुष आरमोरी, 75 वर्षीय पुरुष गडचिरोली,65 वर्षीय पुरुष वनश्री कॉलोनी नवेगाव गडचिरोली,65 वर्षीय पुरुष कुरुड ता.वडसा यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 79.47 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 18.51 टक्के तर मृत्यू दर 2.02 टक्के झाला.

नवीन 516 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 177, अहेरी तालुक्यातील 58, आरमोरी 30, भामरागड तालुक्यातील 7, चामोर्शी तालुक्यातील 42, धानोरा तालुक्यातील 26, एटापल्ली तालुक्यातील 36, कोरची तालुक्यातील 9, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 31, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 22, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 19 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 59 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 627 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 222, अहेरी 66, आरमोरी 45, भामरागड 18, चामोर्शी 61, धानोरा 04, एटापल्ली 26, मुलचेरा 10, सिरोंचा 26, कोरची 38, कुरखेडा 21, तसेच वडसा येथील 90 जणांचा समावेश आहे.