ज्ञानेश्वर शेजुळ यांचा वाढदिवस विविध उपक्रमानी साजरा केला

30

🔹ज्ञानेश्वर शेजुळ यांचे सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक

🔸अनेक मान्यवरांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

✒️अतुल उनवणे(जालना प्रतिनिधी)

जालना(दि.6मे):-भारतीय जनता पार्टीचे जालना जिल्हाउपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर (माऊली)शेजुळ यांनी काल दि.04/05/2021 रोजी विनाकारण होणार्‍या खर्चाला फाटा देत कोरोना पार्श्वभुमीवर नाविण्यपुर्ण कार्यक्रम राबवुन वाढदिवस साजरा केल्याने श्री ज्ञानेश्वर (माऊली)शेजुळ यांना मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा.मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर,मा.आ.अरविंदराव चव्हाण,मा.आ.तोताराम कायंदे,भाजपा युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुलभैय्या लोणीकर, पि.एन.यादव,सर्जेराव जाधव,रमेश यज्ञेकर जोशी,अंकुशराव बोबडे,रमेश महाराज वाघ, सुजित जोगस,सुनिल बापु आर्दड,शंकरराव उगलमुगले,किसनराव मोरे,सौ.जिजाबाई जाधव,सौ.कमलताई तुल्ले,दिलीपराव भुतेकर, अशोकराव डोके, दिलीप पवार,डाॅ.शरद पालवे,महादेव घेंबड अरुणराव उफाड यांच्यासह अनेक मान्यवर मंडळींनी ज्ञानेश्वर शेजुळ यांचे कौतुक करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

गेल्या वर्षभरापासुन संपुर्ण जगामध्ये कोरोनाने थैमान घातल्यामुळे जनता भयभित झाली आहे.कोरोना विषाणुने अनेकांचे बळी घेतले आहेत. परंतु या दुषित वातावरणामध्ये अनेक आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी व स्वच्छता कर्मचारी जिव धोक्यात घालुन कोरोना योद्धा म्हणुन कर्तव्य बजावत आहेत.त्यात अनेक अधिकारी व कर्मचार्‍यांना आपला जिव गमवावा लागला आहे. या कोरोना योद्ध्यांना योग्य मानसन्मान व वाढीव मानधन मिळणे आवश्यक असतांना राज्य शासनाने त्यांना आवश्यक ते संरक्षण व वाढीव मानधन दिले नाही.

या पार्श्वभुमीवर काल भा.ज.पा.चे जालना जिल्हाउपाध्यक्ष, ज्ञानेश्वर {माऊली} शेजुळ यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा फलकावर सुरक्षित रहा, कोरोनापासुन बचाव करा, तोडांला सतत मास्क लावा, सतत सॅनिटायझरचा वापर करा, सामाजिक अंतर ठेवा, व पात्र सर्व नागरिकांनी कोरोनाची लस टोचुन घ्यावी असा जनजागृतीचा संदेश श्री ज्ञानेश्वर शेजुळ यांनी दिला आहे.त्याच सोबत सेवली पोलीस ठाण्याच्या नव्याने रुजु झालेल्या कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरिक्षक श्रीमती मंजुषा सानप मॅडम यांचा पुष्पगुच्छ,मास्क व सॅनिटायझरची बाटली देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच सेवली येथिल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी श्री कुलकर्णी साहेब यांचा सुद्धा कोरोना योद्धा म्हणुन प्रातीनिधीक स्वरुपात सत्कार करण्यात आला. यावेळी शिवराज तळेकर,प्रभाकर गाढवे,परमेश्वर सोळंके,गणेश ढाकणे, राजेंद्र ढाकणे,बाळकृष्ण देशमुख,पत्रकार अन्सारी यांच्यासह सेवली प्रा.आ.केंद्राचे अनेक आरोग्य कर्नचारी व सेवली पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचार्‍यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. श्री ज्ञानेश्वर शेजुळ राबवलेल्या नाविण्यपुर्ण कार्यक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असुन हजारो नागरिकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत…..