कायद्याचे उल्लंघन करून दुकाने सुरू ठेवणाऱ्यांवर कडक कारवाई

28

✒️प्रतिनिधी विशेष(संजय कोळी)

शिरपूर(दि.8मे):- Covid-19 मुळे उद्भ वलेल्या साथरोग अधिनियम १८९७ मध्ये नमूद बाबींना अनुसरून मा.या जिल्हा कार्य असो धुळे व मुख्य कार्याकारी अधिकारी सो.जी. प.धुळे यांच्या आदेशावरून covid -१९ बाबत संचारबंदी लागू केलेली आहे. त्यास अनुसरून म. गट विकास अधिकारी सो.प. स. शिरपूर यांनी पं.स. अंतर्गत कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गावात साथरोग नियंत्रात आणणे कामी आदेशित केले आहे.

त्यानुसार आज दि.७/५/२०२१ शुक्रवार रोजी गुरु गावात पथक प्रमुख श्री. के. व्ही. भदाने सो. केंद्रप्रमुख, श्रीमती प्रतिभाताई यशवंत मराठे पोलीस पाटील, श्री प्रमोद भीमराव पाटील ग्रामसेवक , श्रीमती सूर्यवंशी मॅडम मुख्याध्यापिका, श्रीमती सरला विलास साळुंखे आरोग्य सेविका, श्रीमती छाया पांडुरंग शिरसाट अंगणवाडी सेविका,श्रीमती प्रतिभा प्रमोद मराठे (आशा वर्कर) यांनी गावातील समस्त ग्रामस्थांना covid -१९ बद्दल जनजागृती करून देखील काही नागरिक बेजबाबदारपणे वागत असल्याचे निदर्शनास आले.

ब्रेक द चैन बाबत १३ एप्रिल २०२१ रोजी च्या आदेशा मधील कलम २ नुसार लिखित केलेल्या आदेशानुसार गावातील जनतेने कुठलेही प्रकारचे सहकार्य दाखवले नाही सकाळी ११:०० नंतर दुकान बंद ठेवण्याचे आदेश देऊनही दुकाने चालू ठेवली. आदेशाचे पालन न करणारे दुकानदार राजेश्वर कापड दुकान १००० हजार रुपये दंड, हार्डवेअर दुकान ५०० रुपये दंड, भवानी किराणा दुकान ५०० रुपये दंड अशा एकूण दुकानदारांवर कारवाई केली एकूण दंडवसुली ३४ हजार रुपये पावती फाडून वसुली करण्यात आली. अशाप्रकारे दंडात्मक कारवाई कोरोना समिती टीम ने केली.