शासन निर्णयाला हरताळ

20

🔹सामान्य रुग्णालयात दिव्यांग व्हॅक्सीन पासुन वंचित

✒️खामगाव प्रतिनिधी(मनोज नगरनाईक)

खामगाव(दि.8मे):-तालुक्यातील गवंढाळा गाव येथिल जेष्ठ दिव्यांग श्री लक्ष्मीनारायण मेघराज भट्टड यांनी काही दिवसापुर्वी व्हॅक्सिन मिळविण्यासाठी आॅनलाईन रजिस्टेशन केले होते.त्यांनी केलेल्या नोंदणीनुसार ते दि. ०७/०५/२०२१ला सामान्य रुग्णालय खामगाव येथे गेले त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या कर्मचारी यांनी डोझ साठी तुम्ही ऊद्या या म्हणुन त्यांना परत पाठविले,ते दि ०८/०५/२०२१ला म्हणजे शनिवारला रुग्णालयात हजर झाले असता त्या ठिकाणी गेले असता साठा शिल्लक नसल्याचे फलक दाखवुन त्यांना परत पाठविण्याचा प्रकार या रुग्णालयाच्या माध्यमातुन झाला आहे.

आधिच वयोव्रुद्ध त्यात अपंग त्यांना दुसर्या डोझ पासुन तसेच त्यांना प्रवासाच्या माध्यमातुन होणार आर्धिक व मानसिक ञास त्यांना सहन करावा लागत आहे केद्र सरकारचा तसेच राज्य सरकार चा असलेला दिव्यांग हितार्थ असलेल्या परिपञक दिव्यांग -२०२१ /प्र.क्र.३६/ दि.क्र.२ दि.०३/०५/२०२१ला सरळसरळ वा आॅनलाइनच्या माध्यमातुन येथिल व्यवस्थापन वर्गाला वा कर्तव्यदक्ष कोरोना साठी मिळणार्या लसींच्या अल्प साठ्याने जिवाची बाजी लावणार्या डाॅक्टर वर्गाला कर्मचारी वर्गाला व्हॅक्सिन आहे, नाही आहे.

यासाठी तोंड द्यावे लागत आहे शासनाकडुन कमी प्रमाणात होत असलेल्या या अल्प पुरवठ्याने त्यांच्याच परिपञकाला व आॅनलाईन प्रक्रियेला हरताळ फासण्याचा प्रकार शासनाकडुन याठिकाणी होत असल्याचे दिसुन येत आहे.तसेच या विषयीया लसी करिता निवासी वैद्दकिय अधिकारी डाॅ निलेश टापरे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी कळविलेकी सध्या 2nd dose साठी लागणारी vaccine जिल्हात उपलब्ध नाहीत ,तसेच
सध्या 18 ते 44 साठीचा कोटा आला आहे आणि तो 45 वरील व्यक्तीं साठी वापरायचा नाही असा लेखी आदेश आहे