रानमेवा, होतोय गावातून हद्दपार?

24

✒️खटाव प्रतिनिधी(नितीन राजे)

खटाव(दि.9मे):-उन्हाळा संपून आता तो जवळजवळ पावसाळ्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला, मात्र डोंगरच्या काळ्या मैनेमे मात्र अध्यापक गावाकडे तोंड फिरवलं नसल्याने ती आता या गावातून हद्दपार झाली की काय असे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.मराठी माघ महिना ते फाल्गुन महिना म्हणजे जवळ जवळ तीन महिने फेब्रुवारी ते मार्च एन्ड पर्यंत कैऱ्यांचा मनसोक्त आनंद घेतला जातो.

तोपर्यंत चैत्रपालवी बरोबरच पाडाला पिकेलेल्या आंब्याचा सुवास दरवळत असतानाच डोंगराची काळी मैना गावाकडे डोकावत असते. काट्यांनी विणलेल्या टोपल्यांमध्ये गच्च भरलेले काळीकुट्ट करवंदे पानांचा द्रोण मधून खाली पडत असतात त्यावर टाकलेले थोडेसे मीठ कशाचीही बरोबरी करू शकत नाही असा हा रानमेवा रानातच कोमजत आहे.अवघ्या काही दिवसांचा कालावधी, वर्षभर वाट बघायला लावतो, आणि त्यात ही अशी नैसर्गिक आपत्ती त्यामुळे त्यांच्या जीवावर अगदी महिना बर का होईना काही जणांचे पोट भरते. त्यांनादेखील या सर्व लॉक डाऊन चा परिणाम भोगायला लागलेला आहे.

कारण ही करून दे आहेतच अशी की जाळीतून काढली की ती सरळ खवय्यांच्या दारापर्यंत येतात आणि याचे उत्पादन हे डोंगराळ भागात असल्याने 100 किलोमीटर दूर होऊन देखील लोक ग्रामीण भागाकडे येत असतात. खास करवंद विक्रीसाठी. परंतु तो आवाजच आता ग्रामीण भागातून लुप्त होत,तोच आता वैशाखातील म्हणजेच जून ची जान जांभूळ ची ओढ देखील लागू लागले आहे .मोहर तर फुटलेला आहे. आता जान अडकली ति जांभळा त आता नाहीतर . पुढील वर्षाची वाट बघण या व्यतिरिक्त खवय्यांना पर्याय उरलेला नाही