ग्रामीण भागात जितेश अंतापूरकर यांच्या नावाची जोरदार चर्चा

46

✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

हणेगाव(दि.9मेे):-कोरोना महामरीमुळे गेल्या एक वर्षभरापासून चाललेल्या हाहाकारामुळे जनता हैराण आहे.अशातच देगलूर-बिलोली मतदारसंघातील आमदार रावसाहेब अंतापूरकर यांची कोरोना बीमारीमुळे म्रत्यू झाल्यामुळे मतदारसंघ पोरका झाला आहे.एक चांगला व्यक्तीमत्व,साधा सरळ एक वचनी गोरगरीबांचा विचार करणारा असा एक नेता काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे या मतदारसंघातील जनता आज घडीला त्यांचाच मुलगा राष्ट्रीय युवक कॉग्रेस प्रदेश सरचिटणीस जितेश रावसाहेब अंतापूरकर यांच्या नावाची चर्चा करत आहेत.
या मतदारसंघातील जनता कै.रावसाहेब अंतापूरकर यांच्या कामावर समाधान वाटत असताना व पुढील कार्याची स्वप्न बघत असताना काळाने घात घातला व या भागातील जनतेच्या स्वप्नावर पाणी फेरले.

याच धोरणावर पुढील पोटनिवडणूकीत नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी जसे आमदार रावसाहेब अंतापूरकरच्या निधनानंतर जितेश अंतापूरकर यांच्यावर विश्वास दाखवून राष्ट्रीय कॉग्रेस प्रदेश सरचिटणिस पदाची जिम्मेदारी टाकली आहे. त्याच विश्वासावर आणखी एक वेळेस आमदारकीची टिकीट देण्यात यावे .अशी चर्चा ग्रामीण भागातून होत आहे.
—————————–
सध्या घडीला ग्रामीण भागात कै.रावसाहेब अंतापूरकर यांच्यावर विश्वास असल्यामुळे व या भागासाठी सुखदुःखात धावून येणारा नेता म्हणून त्यांची गनणा होत होती पण काळाने घात केला व एक सच्चा नेत्याला आमच्यापासून हिरावून घेतला.याच आधारे या भागातील लोकांची एकच मागणी आहे की पुढील आमचा नेता जितेश अंतापूरकर हेच राहतील.अशी भावना या भागातील जनतेची आहे.
श्री प्रशांत पाटील दोसपल्ले मानूर
कै.रावसाहेब अंतापूरकर मित्रमंडळ
—————————–