पाणीटंचाई प्रकरणी नगर परिषद हिंगणघाट कोमात

35

🔹डाॅ उमेश वावरे यांनी केले पाण्याचे वाटप

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.12मे):-कोविड19 मुळे सपूर्ण वर्धा जिल्ह्यात लाॅकडाॅऊन घोषित करण्यात आला. शासनाच्या नियमांचे उल्लघंन न करता नागरिक आपला घरीच राहून शासनाला सहकार्य करीत आहे. हिंगणघाट शहरात अमृत योजना योजनेंअंतर्गत शहरात खुप मोठ-मोठ्या टाक्या बांधण्यात आल्या . हे सर्व असताना सुद्धा दर उन्हाळ्यात पाणी टंचाई चा सामना जनतेला करावा लागतो आहे. नगरपरिषद ला बाब माहीत असून सुद्धा पालिका यावर काही उपाय योजना करीत नाही.हि बाब गंभीर असून याचा त्रास फक्त जनतेला होते.

सदर बाब लक्षात घेता आज ११ रोजी वंचित बहूजन आघाडी चे नेते डाॅ उमेश वावरे यानी स्वतःजावून संत तुकडोजी वार्ड येथील सरकारी दवाखान्याच्या मागील परिसरात पाण्याचे वाटप केले .हे काम नगर पालिकेचे असून लवकरात लवकर पाण्याचे टैंकर चालू करुन टंचाईग्रस्त पाणीपुरवठा करावा अन्यथा येथील रहिवाश्यांना घेवून नगर पालिकेवर मटकेफोड आदोलन करण्यात येईल.असा इशारा देण्यात आला.यावेळी मनीष कांबळे .दिलिप कहूरके. बन्सोड सर .देवेंद्र भालशंकर तसेच परिसरातील समस्याग्रस्त नागरिक उपस्थित होते..