परभणी जिल्हात होणार मे व जून 2021 या महिन्याचे स्वस्त धान्य दुकानातून धान्य वितरण होणार मोफत

99

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.12मे):-कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भावास प्रतिबंध व्हावा याकरिता महाराष्ट्र राज्यात संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या आर्थिक सहायता अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत अंतोदय अन्नयोजनेच्या *42043* कार्डधारकांना *9620* क्विंटल गहू व *4927* क्विंटल तांदूळ माहे मे 2021 करिता ( *प्रति शिधापत्रिका पस्तीस किलो अन्नधान्य)* तसेच प्राधान्य कुटुंब योजनेच्या *976225* लाभार्थ्यास प्रतिव्यक्ती *03* किलो गहू व *02* किलो तांदूळ याप्रमाणे *29791* क्विंटल गहू व *17977* क्विंटल तांदूळ परभणी जिल्ह्यात मोफत देण्यात येत आहे.

कोरोनाव्हायरस च्या प्रादुर्भाव मुळे आलेल्या आर्थिक संकटात गरिबांना समोर जावे लागत असल्यामुळे या कठीण प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यासाठी *माहे मे व जून* 2021 करीता राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्यव्यतीरिक्त जिल्हा परभणी जिल्ह्यात अंतोदय व प्रधान योजनेच्या *1176999* सदस्यांना *81313* क्विंटल गहू व *50083* क्विंटल तांदूळ प्रति सदस्य 5 किलो अन्नधान्य मोफत वितरीत केले जाणार आहे.

प्रत्येक क्षेत्रातील स्थालनतरीत प्रोट्याबिलिटी अंतर्गत अन्नधान्य वितरण करण्यात येणार आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना *01 व 02* आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत ज्या तालुक्यात खाणे योग्य चनाडाळ किंवा तूरडाळ शिल्लक आहे तेथे अंत्योदय अंनयोजनेतील व प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिमहा शिधापत्रिका *01 किलो* *मोफत वाटप* करण्यात येणार आहे . कोरोणा संसर्ग साखळी तोडण्यासाठी शासनाने लॉक डाऊन केले आहे जाहीर केले आहे.परंतु स्वस्त धान्य दुकानातून धान्य वितरण करताना इ -पॉस मशीनवर ग्राहकाचा अंगठा घातल्याने संसर्ग होण्याची शक्यता असल्यामुळे कार्डधारक अंगठा लावण्यास घाबरत असल्यामुळे शासनाने आता मे 2021 करीता इ -पॉस मशीन वर कार्डधारक ऐवजी दुकानदाराचा अंगठा घेऊन धान्य वितरण करण्याचा निर्णय घेतला असून कार्डधारकांना पावती देणे आवश्यक केले आहे