ग्रामीण भागात महीलाचे गट तयार करुन दामदुप्पट कर्ज वसुल करणाऱ्या फायन्स कंपनि धारकां कडून होत असलेली लुट तात्काळ थांबवावी

25

✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर)मो:-7387878769

यवतमाळ(दि.14मे):-दिनांक १३/०५/२०२१ रोजी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने काळी दौलत खान येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच व पोलिस पाटील यांना ग्रामीण भागातील महिलांनी गटामार्फत घेतलेले कर्ज वसुली काही काळ थांबविण्यात यावी, असे अशायांचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष शेख अशपाक भाई व गावातील महिलांनी सरपंचांना लेखी स्वरूपात दिले आहे, सविस्तर माहिती अशी की कोरोना विषाणूच्या महामारी संसर्गामुळे राज्यांमध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये लॉक डाऊन पुकारण्यात आला आहे,या लॉक डॉनमुळे हातावर पोट भरणाऱ्या मजूरदार कष्टकरी कामगार महीला यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

ग्रामीण भागातील महिलांनी लघु उद्योगासाठी काही प्रायव्हेट फायन्स दाराकडून गटामार्फत कर्ज घेतले होते . पंरतु त्यां कर्जाची परतफेड करण्यासाठी हप्ते पाडून देण्यात आले होते, परंतु हाताला काम नसल्यामुळे व व्यवसाय रोजमंजुरी ,व या महामारी संसर्ग मुळे दुकाने बंद असल्यामुळे हप्त्याची परतफेड करणे शक्यच होत नाही, अशी परिस्थिती असताना सुद्धा फायन्स कंपनीवाल्यानी त्यांची वसुली थांबलीच नाही. त्यांची वसुली थांबवण्यात यावी, या साठी वंचित बहुजन आघाडीचे मार्फत सरपंच पोलिस पाटलांना वसुली काही काळासाठी थांबवण्यात यावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहेत.