चंद्रपूर जिल्ह्यात (दि.16मे) रोजी 24 तासात 1282 कोरोनामुक्त, 674 कोरोना पॉझिटिव्ह तर 20 कोरोना बधितांचा मृत्यू

35

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.16मे):-जिल्ह्यात मागील 24 तासात 1282 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 674 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 20 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 77 हजार 575 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 66 हजार 226 झाली आहे. सध्या 10 हजार 97 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 34 हजार 760 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 53 हजार 903 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील गजानन महाराज मंदिर चौक परिसरातील 62 व 77 वर्षीय पुरुष, तुकुम येथील 75 वर्षीय महिला, रामनगर येथील 42 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय पुरुष. भद्रावती तालुक्यातील कोंढा येथील 54 वर्षीय महिला, 60 वर्षीय महिला, घोडपेठ येथील 31 वर्षीय महिला. बल्लारपूर तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष. सावली तालुक्यातील 70 वर्षीय महिला. चिमूर तालुक्यातील 62 वर्षीय पुरुष, वडाळा पैकु येथील 60 वर्षीय पुरुष. सिंदेवाही तालुक्यातील नांदगाव येथील 65 वर्षीय महिला. नागभीड तालुक्यातील नवखळा येथील 55 वर्षीय पुरुष. ब्रह्मपुरी तालुक्यातील कुर्झा येथील 60 वर्षीय पुरुष. राजुरा तालुक्यातील 46 वर्षीय पुरुष. मूल तालुक्यातील 59 वर्षीय महिला. कोरपना तालुक्यातील 45 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला तर वणी-यवतमाळ येथील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1252 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1159 , तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 35, यवतमाळ 40, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 674 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 227, चंद्रपूर तालुका 20, बल्लारपूर 80, भद्रावती 47, ब्रम्हपुरी 20, नागभिड 10, सिंदेवाही 31, मूल 38, सावली 26, पोंभूर्णा 34, गोंडपिपरी 04, राजूरा 34, चिमूर 04, वरोरा 45, कोरपना 40, जिवती 08 व इतर ठिकाणच्या 06 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

🔺गडचिरोली जिल्ह्यात आज (16 मे) 416 कोरोनामुक्त, 8 मृत्यूसह 240 नवीन कोरोना बाधित

गडचिरोली(दि.16मे):- आज जिल्हयात 240 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 416 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 27342 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 24038 वर पोहचली. तसेच सद्या 2681 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 623 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.

आज 8 नवीन मृत्यूमध्ये 62 वर्षीय पुरुष रामपूरी वार्ड गडचिरोली, 72 वर्षीय पुरुष आमगाव ता.वडसा, 55 वर्षीय पुरुष व्याहाळ ता.सावली.जि.चंद्रपूर, 87 वर्षीय पुरुष राजेन्द्र वार्ड ता.वडसा, 70 वर्षीय पुरुष पालोरा ता.आरमोरी, 40 वर्षीय पुरुष देयोपायली ता. नागभीड जि.चंद्रपूर, 45 वर्षीय पुरुष येंनगला ता.आरमोरी, 37 वर्षीय पुरुष गट्टा ता.एटापल्ली यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.92 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 9.81 टक्के तर मृत्यू दर 2.28 टक्के झाला.

नवीन 240 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 72, अहेरी तालुक्यातील 37, आरमोरी 18, भामरागड तालुक्यातील 03, चामोर्शी तालुक्यातील 42, धानोरा तालुक्यातील 10, एटापल्ली तालुक्यातील 05, कोरची तालुक्यातील 03, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 5, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 7, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 16 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 22 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 416 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 141, अहेरी 30, आरमोरी 44, भामरागड 17, चामोर्शी 47, धानोरा 20, एटापल्ली 17, मुलचेरा 09, सिरोंचा 38, कोरची 04, कुरखेडा 28 तसेच वडसा येथील 21 जणांचा समावेश आहे.