न्यू सहारा सेवाभावी संस्था परळी यांच्या तर्फे 15 ऑक्सीजन सिलेंडर कोव्हीड टास्क फोर्स परळीला भेट

29

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

परळी(दि.19मे):-काल दिनांक १७ मे रोजी आजाद नगर परळी वैजनाथ येथे न्यू सहारा सेवाभावी संस्थेच्या वतीने कोव्हीड टास्क फोर्स परळी यांना १५ ऑक्सिजन सिलेंडर भेट करण्यात आले. जमात-ए-इस्लामी हिंद परळी व स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया परळी यांच्या संयुक्त विद्यमाने ०४ मे पासून सुरू असलेले हे टास्क फोर्स कोरोना रूग्णांसाठी वरदान ठरत आहे. या टास्क फोर्सच्या माध्यमातून एक हेल्पलाइन नंबर व ऑक्सीजन सेंटर चालू आहे. गरजू लोकं मोबाईल द्वारे या हेल्पलाईन नंबर वर संपर्क साधून तज्ञ लोकांकडून कोरोना उपचाराबाबत मार्गदर्शन प्राप्त करत आहेत व ऑक्सिजनची गरज असलेले पेशंट्स डॉक्टरां मार्फत कन्सल्ट करून ऑक्सिजन मिळवत आहेत.

या कोविड टास्क फोर्स मध्ये पुर्वी एकूण १५ ऑक्सिजन सिलेंडर्स होते. काल न्यू सहारा सेवाभावी संस्थानी पंधरा ऑक्सिजन सिलेंडर भेट दिले. आता य कोविड टास्क फोर्स जवळ एकूण ३० सिलेंडर गरजू रूग्णांसाठी उपलब्ध आहेत. परळी शहर व तालूक्यातील ज्या पेशंटला अक्सिजन सिलेंडर ची गरज आहे ते लोक संपर्क साधू शक्तात. कोविड टास्क फोर्स परळी हेल्प लाइन नंबर 8446171797
या कोविड टास्क फोर्सनी अत्ता पर्यंत ३५ गरजू लोकांना अक्सिजन सिलेंडर दिले आहे.

जमात-ए-इस्लामी हिंद परळीचा कार्यालयात सिलेंडर दान करतेवेळी एक छोटासा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी नगर पोलिस स्टेशनचे एपीआय गीते साहेब व सिराज अहेमद साहब कॉन्ट्रॅक्टर, शेख अन्वर मिस्कीन (स्वच्छता सभापती नगर परिषद परळी), शेख मोईन फारूखी ( अध्यक्ष यू सहारा सेवाभावी संस्था परळी),सय्यद इफ्तिखार सर (जिल्हाध्यक्ष जमात-ए-इस्लामी बीड), सय्यद अनवर सर ( शहर अध्यक्ष जमात-ए-इस्लामी परळी) व न्यू सहारा सेवाभावी संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.