कारच्या धडकेत तरुण जागीच ठार

30

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.24मे):-शहरातील रमाबाई नगर येथील रहिवासी राहुल बापूराव अवचार हे परळी रोडवर असलेल्या गोकुळ हॉटेल वरून आपले कर्तव्य बजावून गंगाखेड शहराकडे पायी येत असताना कारने जोराची धडक दिल्यामुळे राहुल याचा जागीच मृत्यू घडल्याची घटना २२ मे रोजी घडली.राहुल बापुराव अवचार वय ३२ हे २२ मे रोजी हॉटेल गोकुळ येथून रात्री नऊ वाजता कामावरून गंगाखेड शहराकडे येत असताना हॉटेल परळी रोड वरील लव्ह बर्ड हॉटेल समोरील रस्त्यावर कार क्रमांक एम.एच १४ बी.के.१२८३ भरधाव वेगाने येऊन जोरात धडक दिली.

घटनास्थळावरून जाणारे आनंदा निळे, बाळासाहेब काळे व दत्तराव सोलव यांनी कारला थांबविण्याचा प्रयत्न केला. पण कार चालक कार घेऊन गंगाखेड शहराकडे भरगाव वेगाने निघून गेला. सदरील घटना गोकुळ हॉटेल चे मालक व तेथील नागरिकांनी फिर्यादी विजय बापूराव अवचार यांना सांगितल्या नुसार चालकाविरुद्ध गंगाखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून सदरील प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश राठोड हे करत आहेत.