चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याच्या निर्णयाचा शेतकरी संघटनेतर्फे निषेध

52

🔹लोकशाहीतील जनविरोधी व दुर्दैवी निर्णय – अँड.वामनराव चटप

✒️शब्बीर सय्यद जहागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-9623896574

जिवती(दि.27मे):-चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या सहा वर्षापासून सुरू असलेली दारूबंदी उठविण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचे वृत्त आले आहे. राज्य सरकारचा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी लोकविरोधी असल्याची टीका करीत या निर्णयाचा शेतकरी संघटना, शेतकरी महिला आघाडी व शेतकरी युवा आघाडीने निषेध केला आहे. हा निर्णय घेतांना राज्य सरकारने दिलेले अवैध दारूविक्री व गुन्हेगारी हे कारण सरकारच्या अकार्यक्षमतेचे द्योतक आहे. हा निर्णय अत्यंत दुर्देवी असून लोकांच्या आणि चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो महिलांच्या सन्मानाच्या विरोधात आहे.

कोरोना काळात लोकांना विरोध करण्याची संधी मिळू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. लोकांचा आणि महिलांचा प्रचंड विरोध असतांना हा दुर्दैवी निर्णय घेण्यात आल्याचे मत शेतकरी संघटनेने व्यक्त केले आहे.

या लोक विरोधी निर्णयाचा शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार अँड. वामनराव चटप, अरुण नवले, अँड. शरद कारेकर, प्रा.ज्योत्स्ना मोहितकर, पौर्णिमा निरंजने, अँड. श्रीनिवास मुसळे, निळकंठराव कोरांगे,रमेश नळे, सुधीर सातपुते, प्रा.निलकंठ गौरकार, तुकेश वानोडे, डॉ.संजय लोहे,पंढरी बोन्डे,दिनकर डोहे, सय्यद शब्बीर जागीरदार, देविदास वारे,इस्माईल सय्यद, नरसिंग हामणे, मुन्नी परवीन शेख, उध्दव गोतावळे, रघुनाथ सहारे, दिलीप देरकर, मधुकर चिंचोलकर,भाऊजी कन्नाके, यांचेसह शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाचा निषेध केला आहे.