उमरखेड येथील पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस तेलंगाना येथून केली अटक नराधांम गजाआड

30

🔺सत्यनिर्मिति महिला मंडल अध्यक्षा सौ. शबाना खान यांच्या मदतीने अरोपीस केले पिंजऱ्याच्या आत

✒️यवतमाळ,जिल्हा प्रतिनिधी(बलवंत मनवर)मो:-7387878769

उमरखेड(दि.27मे):-येथील पाच वर्षीय मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी अखेर उमरखेड पोलीस स्टेशनला आरोपिस अटक करण्यास यश प्राप्त आले आरोपी नज़ीर उस्मान शेख याला तेलंगाना राज्यात नवी पेठ येथून पकडण्यात आले असुन उमरखेड येथील सामाजिक संघटना सत्यनिर्मिति महिला मंडल तथा अध्यक्षा व महिला दक्षता सदस्या सौ, शबाना खान व महिला सुरक्षा मंच जिल्हाध्यक्ष इरफान खान पठान यांच्या सहकार्याने पोलीस प्रशासनने कुठलाही विलंब न लावता दोन दिवसा पासून पसार असलेला आरोपी नज़ीर यास अटक करण्यात आली.

सदर प्रकरणी शहरामध्ये व नागरिकामधे रोष होते नागरिक त्या अरोपिला फाशीची शिक्षा मागणी व्हावी हि मागणी होती आणी या बाबत म्हणून निवेदन देत होते, प्रशासकीय यंत्रंनेचा अधिक तपास देखील सुरुच होता पंरतु आरोपि पकडन्यास उमरखेड येथील कर्तबगार, पोलिसांना यश देखील आले, व नेहमी महिलांच्या हक्का साठी संघर्ष करणारी सत्यनिर्मिति महिला मण्डलने प्रशासनास आरोपिस अटक करण्यास महत्वाची भूमिका पार पाडली व निभावली जेने सर्व गावात व उमरखेड तालुक्यात तसेच नागरिकात त्यांचे कौतुक होत आहे.शब्द सुमनाने स्वागत करितआहे*