चंद्रपूर जिल्ह्यात (दि.29मे) रोजी 24 तासात 644 कोरोनामुक्त, 110 कोरोना पॉझिटिव्ह तर 09 कोरोना बधितांचा मृत्यू

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.29 मे):- जिल्ह्यात मागील 24 तासात 644 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे तर 110 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 09 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 82 हजार 307 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 77 हजार 633 झाली आहे. सध्या 3हजार 235 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 68 हजार 701 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 83 हजार 383 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील खुटाळा येथील 54 वर्षीय महिला, समता नगर येथील 75 वर्षीय पुरुष, परसोडी येथील 72 वर्षीय पुरुष. बल्लारपूर तालुक्यातील 38 वर्षीय महिला. Bवरोरा तालुक्यातील 70 वर्षीय पुरुष. सिंदेवाही तालुक्यातील 70 वर्षीय पुरुष. गोंडपिपरी तालुक्यातील 73 वर्षीय पुरुष. चिमूर तालुक्यातील ताडगाव येथील 58 वर्षीय पुरुष. चामोर्शी तालुक्यातील 63 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 1439 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1334, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली 38, यवतमाळ 48, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 110 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 22, चंद्रपूर तालुका 07, बल्लारपूर 15, भद्रावती 02, ब्रम्हपुरी 18, नागभिड 01, सिंदेवाही 03, मूल 07, सावली 01, पोंभूर्णा 00, गोंडपिपरी 02, राजूरा 11, चिमूर 04, वरोरा 04, कोरपना 12, जिवती 00 व इतर ठिकाणच्या 01 रुग्णांचा समावेश आहे.नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

🔺गडचिरोली जिल्ह्यात आज (29 मे) 173 कोरोनामुक्त तर 97 नवीन कोरोना बाधित

गडचिरोली(दि.29मे):- जिल्हयात 97 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 173 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 29237 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 27473 वर पोहचली. तसेच सद्या 1050 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 714 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.

आज 4 नवीन मृत्यूमध्ये रा.खाकरी ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय पुरुष, ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील 43 वर्षीय पुरुष, रा. कोंडाळा ता. वडसा जि. गडचिरोली येथील 67 वर्षीय पुरुष गडचिरोली येथील 60 वर्षीय पुरुष यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.97 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 3.59 टक्के तर मृत्यू दर 2.44 टक्के झाला.

नवीन 97 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 13, अहेरी तालुक्यातील 00, आरमोरी 06, भामरागड तालुक्यातील 01, चामोर्शी तालुक्यातील 07, धानोरा तालुक्यातील 03, एटापल्ली तालुक्यातील 11, कोरची तालुक्यातील 02, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 08, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 29, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 08 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 09 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 173 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 34, अहेरी 19, आरमोरी 11, भामरागड 05, चामोर्शी 28, धानोरा 10, एटापल्ली 04, मुलचेरा 20, सिरोंचा 22, कोरची 02, कुरखेडा 03 तसेच वडसा येथील 15 जणांचा समावेश आहे.