पोलीस कर्मचारी करतोय शरीरसुखाची मागणी

29

🔹पोलीस कर्मचाऱ्यांच्या जाचास कंटाळून ग्रामस्थांनी गाठले पोलीस अधीक्षक कार्यालय

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

अकोले(दि.4जून):-अहमदनगर मधील अकोले तालुक्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या जाचास कंटाळून तक्रारदार ग्रामस्थ व महिलेने पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले आहे सदर पोलीस कर्मचारी आरोपींना पाठीशी घालून खोटे गुन्हे दाखल करीत आहे तर माझ्या शरीर सुखाची मागणी करत असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला या पोलीस कर्मचारी चे तात्काळ निलंबन करण्याचे तक्रारदार महिला व ग्रामस्थांनी अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांना निवेदन दिले यावेळी सुरेखा मंडलिक देवराम भोकनळ गणेश धुमाळ जनार्दन नवले सर्व राहणार धामणगाव रोड अकोले आदी ग्रामस्थ उपस्थित होते सदर पीडित महिलेने अर्जात म्हटले आहे की मी विधवा असून दिरा बरोबर जमिनीचे वाद सुरू आहे या घरगुती त्रासाबाबत पोलीस स्टेशनला तक्रार केली होती.

तक्रारीचा तपास कामी अकोला पोलीस स्टेशन चे कर्मचारी सचिन रमेश शिंदे यांनी माझ्याशी ओळख वाढवून एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन सुरू केले तर सातत्याने शरीरसुखाची मागणी करीत आहे सदर पोलिसांनी माझी बदनामी सुरु केली असून खोटे गुन्हे दाखल केले आहे या पोलीस कर्मचाऱ्या मुळे माझ्या मुलाचे व माझे जगणे अवघड झाले असून मला आत्महत्येस प्रवृत्त करीत असल्याचा आरोप महिलेने केला आहे एका अल्पवयीन मुलीला सोन्याबापू कसार त्याने दारुच्या नशेत घरात घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला त्या विरोधात अकोले पोलीस स्टेशनला बालकांचे लैंगिक अधिनियम 2012 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र आरोपी पोलिस कर्मचारी शिंदे यांच्याशी संबंध असल्याने त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही आरोपी सरस पणे प्लीज मुलीच्या घराजवळ येऊन त्रास देण्यास सुरुवात केली आहे गणेश धुमाळ यांनी माझी भाऊ संदीप धुमाळ या जबर मारहाण करण्यात आली यामध्ये संदीप त्याच्या पाठीच्या मणक्यात गंभीर मार लागला आहे.

त्याच्यावर नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे सदर गुन्ह्यात आरोपींना पाठीशी घालण्याचे आले या गुन्ह्यात आरोपींवर क 307 व 379 कलमान्वये गुन्हा दाखल होणे अपेक्षित असताना हे कलम त्यांच्यावर लावण्यात आले नाही त्यामुळे आरोपी जामिनावर सुटून आमच्या कुटुंबांना धमकावत आहे या प्रकरणात देखील शिंदे पोलिस आरोपींना मदत करीत आहे असे निवेदनात म्हटले आहे जनार्दन नवले यांनी माझा बांधकाम व्यवसाय असून शिंदे पोलीस कर्मचारी पैशाची मागणी करीत आहे अन्यथा खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असल्याने तक्रारीत म्हटले आहे चारही तक्रारदारांचे अकोले पोलीस स्टेशनचे कर्मचारी सचिन रमेश शिंदे यांच्याविरोधात गंभीर आरोप असून सदर पोलीस कर्मचारी की चौकशी करून त्यांचे निलंबन करण्याची मागणी करण्यात आली आहे