शेतकरी संघटना व दिवे परिवाराच्या संयुक्त विद्यमाने कोलामगुड्यावर धान्य कीटचे वाटप

27

🔹स्व. कु. स्नेहल प्रभाकरराव दिवे यांचा पाचवा स्म्रुतीदिन

✒️शब्बीर सय्यद जहागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-9623896574

जिवती(दि.५जून):– गरजूंना आवश्यक समयी मदतीचा हात देवून त्यांना आधार देण्याची परंपरा दिवे परिवारानी सदोदीत जपली आहे. स्वर्गिय कु. स्नेहल प्रभाकरराव दिवे हिच्या मनातील समाजसेवेच्या उदात्त भावनेची परंपरा तिच्या मरणोपरांत तशीच तेवत राहावी व गरीब- गरजूंच्या सेवेचे व्रत समाजातील अनेकांना प्रेरणादायी ठरावे यासाठी कु. स्नेहलच्या पाचव्या स्म्रुती दिनाप्रित्यर्थ दिवे परिवार व शेतकरी संघटनेच्या वतीने जिवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटपाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कठीण प्रसंगी एकमेकांचे सहकार्य करण्याची भावना समाजातील प्रत्येकाने अंगिकारावी अशी भावना माजी आमदार तथा शेतकरी संघटनेचे नेते अँड. वामनराव चटप यांनी व्यक्त केले.

शेतकरी संघटना व दिवे परिवाराच्या वतीने अतिदुर्गम अशा बागुलवाई कोलामगुड्यावरील बत्तीस कुटूंबांना आज (ता.५) तूर दाळ, साखर, तेल, तिखट, मीठ, आलू, कांदे, साबण, बिस्कीट अशा जिवनावश्यक वस्तुंच्या किटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी राजुरा बाजार समितीचे माजी सभापती प्रभाकरराव ढवस, नगरसेवक भाऊजी कन्नाके व मधूकर चिंचोलकर, कोलाम विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे, शेतकरी संघटना युवा आघाडी प्रमुख कपिल इद्दे, तालुका उपाध्यक्ष दिलीप देठे, मनोज मून, भीमराव बंडी, ऋषी बोरकुटे, मधूभाऊ जिवतोडे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. आदिम कोलाम बांधवांना मदतीचा हात देऊन सहकार्य केल्याबद्दल बागूलवाईचे गावपाटील भोजू जंगू आत्राम व अन्य कोलाम माता भगिनी व बांधवांनी समाधान व्यक्त केले.