ग्रामपंचायत धामणगाव येथे शिव स्वराज्य दिनानिमित्त राज्याभिषेक सोहळा संपन्न

33

✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी,तालुका प्रतनिधी)मो:-8698648634

गोंडपिपरी(दि6जून):- तालुक्यातील धामणगाव येथे दि.६/६/२०२१ रोज रविवारला सकाळी ११:०० वाजता ग्रामपंचायत मध्ये गुढी उभारून,राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करून शिव स्वराज्य दीन साजरा करण्यात आला.

प्रसंगी सरपंच श्री.सुनील जोगाजी झाडे,ग्रामसेवक अक्नुरवार, उपसरपंच श्री. नंदुजी ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य तथा ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.कोरोनाचा काळात ग्रामपंचायत येथे या वर्षीचा हा महत्वाचा कार्यक्रम असून, लॉकडाऊन चे पालन करून एकदम सुरळीत पार पडला.