शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना मुंबई ३२ ची राज्यस्तरीय आँनलाईन बैठक संपन्न – राजेंद्र लाड

29

✒️बीड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

बीड(दि.७जून):-शासनमान्य महाराष्ट राज्य अपंग (दिव्यांग) कर्मचारी संघटना मुंबई – ३२ यांची रविवार दिनांक ६ जून २०२१ रोजी सांयकाळी ठिक ४.३० वाजता गूगल मिटवर संघटनेचे राज्य पदाधिकारी,राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष व सभासद बंधू – भगिनींच्या मोठ्या उपस्थितीत राज्यस्तरीय बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.अशी माहिती शासनमान्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांनी दिली.गुगल मिटवर राज्याध्यक्ष रवींद्र पाटील,राज्यसचिव परमेश्वर बाबर तसेच राज्यउपाध्यक्षांच्या समवेत राज्यस्तरीय ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आलेली होती.

बैठकीच्या सुरुवातीला राज्यातील संघटनेच्या दिवंगत झालेल्या सभासदांना दोन मिनिटे स्तब्धता बाळगून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.तद्नंतर संघटनेचे राज्यसचिव परमेश्वर बाबर साहेब यांची ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई येथे अव्वर सचिव पदी पदोन्नती होवून नेमणूक झाल्याबद्दल त्यांचा अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला.त्यास सर्वांनी अनुमोदन देवून टाळ्यांच्या गजरात ठराव मान्य करुन अभिनंदन करण्यात येवून भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यानंतर संघटनेचे राज्यसचिव परमेश्वर बाबर साहेब यांनी अभिनंदन केल्याबद्दल सर्वांचे आभार मानून संघटनेची वाटचाल,संघटनात्मक कामकाज,शासनाचे परिपत्रक,पदोन्नती,बदलीधोरण, वैश्विक दिव्यांग ओळखपत्र या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले व सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना योग्यप्रकारे व समाधानकारक उत्तरे दिली.

यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष रविंद्र पाटील यांनीं मार्गदर्शन करतांना सांगितले की,सर्व दिव्यांग कर्मचारी,अधिकारी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटना कार्यरत असून राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांनी सर्वांना सोबत घेऊन जिल्हास्तरावरील सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावेत.संघटनेच्या सर्व दिव्यांग सभासद कर्मचारी बांधवांना शासनाने पुरविलेल्या सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी सर्वांनी दक्ष रहावे व सर्व शासकीय सोयी सवलती त्यांना मिळवून द्याव्यात.दिव्यांग कर्मचारी संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांनी मोठ्या प्रमाणात योगदान द्यावे असे आवाहन केले.

सातारा जिल्हाध्यक्ष हनुमंत अवघडे यांनी बैठक यशस्वी होण्यासाठी मोठे परिश्रम घेवून तांत्रिक बाबी पूर्ण करत बैठकीचे बहारदार सुत्रसंचलन केले.याप्रसंगी राज्यउपाध्यक्ष महादेव सरवदे,डॉ.शेखर कोगणुळकर,बंडू कुमरे,धनंजय घाटे,अमरावती जिल्हाध्यक्ष राजेंद्र दिक्षित,नांदेड जिल्हाध्यक्ष सुधाकर शेवाळे,कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रावसाहेब शिंदे,बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड,मेश्राम सर व इतरांनी दिव्यांग कर्मचारी यांचे सेवाविषयक प्रश्न मांडले.या बैठकीला पद्मिनी कासेवाड,सरकारी वकील जयश्री भटेजा,राज्य संघटना पदाधिकारी,सर्व जिल्हाध्यक्ष व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी आभार राज्यउपाध्यक्ष महादेव सरवदे यांनी मानून आँनलाईन बैठक संपन्न झाली.