भारतीय ऑल मिडीया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल रफिक शेरखान यांचा सत्कार

27

✒️सिल्लोड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

सिल्लोड(दि.8जून):- विविध न्यूज पेपर, सोशल मिडीया तसेच इतर प्रसिद्धी माध्यमातून संपुर्ण देशात काम करणारे श्रमिक तसेच मुक्त पत्रकार तसेच संपादक, मालक, मुद्रक, प्रकाशक, इत्यादी च्या न्याय हक्कासाठी लढणारे भारतीय ऑल मिडीया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल रफिक शेरखान यांचा सत्कार सिल्लोड येथे तहसील कार्यालयाच्या तलाठी भवन येथे तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या हस्ते झाले.

यावेळी पुरवठा विभाग चे नायब तहसीलदार संजय सोनवने याच्या सह पेशकार व्यवहारे, श्रीमती स्वाती म्हसाने, महसुल संघटना अध्यक्ष मुजाहेद पटेल, स्वस्तधान्य दुकानदार केरोसीन परवानाधारक संघटनाचे कार्याध्यक्ष जनार्दन शेजुल ,उपाध्यक्ष राधेश्याम कुलवाल ,सचिव पंडित पारधे, कोषाध्यक्ष सलिम बागवान, सहसचिव पंडित गोडसे, शहर प्रतिनिधी अजीज पठाण, सदस्य जितेंद्र माहोर, संजय पाटील, अनील ओस्तवाल, नारायण काकडे, संजय फरकडे, शे.बशीर , राजु शेख, जावेद रफिक, यांच्या सह अनेक दुकानदार हजर होते. यावेळी 7जुन राष्ट्रीय अन्न सुरक्षा दिन चे औचित्य साधून जेष्ठ शेतकरी तसेच रास्तभाव दुकानदार यांचे हि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

अध्यक्षीय भाषणात तहसीलदार विक्रम राजपूत यांनी अन्नाचे म्हत्व पटवून देताना या साठी कष्ट करणारे अन्नदाते शेतकरी राजा व सरकारच्या सार्वजनिक वितरण प्रणाली मधील महत्त्वाचा दुवा असलेले रास्तभाव दुकानदार यांच्या कार्याचा गौरव म्हणून दुकानदाराचे तालुका अध्यक्ष रफिक शेरखान यांची पत्रकारीता मध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड होणं हे अभिनंदनीय आहे .

या वेळी सत्कारचे उत्तर देताना रफिक शेरखान यांनी लोकशाही च्या चौथा स्तंभ बरोबर काम करण्या साठी भारतीय ऑल मिडीया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया च्या बरोबर येऊन काम करावे असे सांगीतले. सूत्रसंचालन नायब तहसीलदार संजय सोनवने यांनी तर आभार पेशकार श्रीमती स्वाती म्हसाने यांनी मानले.