दिव्यांग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांच्या वाढदिवसानिमित्त “झाडे लावा,पर्यावरण गौरव प्रमाणपत्र मिळवा” अभियान

95

✒️बीड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

बीड(दि.९जून):-शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग (अपंग) कर्मचारी संघटना मुंबई – ३२ जिल्हा शाखा बीड च्या वतीने जिल्हा शाखा बीड चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र शाहुराव लाड,प्राथमिक पदविधर शिक्षक – जिल्हा परिषद कन्या प्रशाला आष्टी,ता.आष्टी,जि.बीड तथा राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक यांच्या ४५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित “झाडे लावा,पर्यावरण गौरव प्रमाणपत्र मिळवा” अभियानाचे आयोजन करण्यात आलेले आहे.अशी माहिती दिव्यांग कर्मचारी संघटनेचे राज्यउपाध्यक्ष महादेव सरवदे यांनी दिली आहे.

मंगळवार दि.१५ जून २०२१ रोजी राजेंद्र लाड यांचा ४५ वा वाढदिवस असल्यामुळे त्यांच्या दिव्यांगांप्रती केलेल्या कार्याचा गौरव व्हावा व त्यांच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी सामाजिक बांधिलकीचे सामाजिक कार्य व्हावे याच उद्देशाने रोपटं (झाड) लावा,फोटो काढा आणि पर्यावरण गौरव प्रमाणपत्र मिळवा या अभियानाचे आयोजन करण्यात आलेले आहे.हे अभियान सर्वांसाठी निःशुल्क आणि खुले आहे.कुटुंबीय,मित्र वा मैत्रिणीसोबत आपण फोटो काढतो पण आता तुम्ही रोपटं (झाड) लावायचं आणि त्याच्यासोबत फक्त एक फोटो काढून पाठवायचा.फोटो पाठविल्यावर काही तासाने तुम्हाला लगेचच पर्यावरण गौरव प्रमाणपत्र मिळेल.यासाठी एक रोपटं (झाड) लावा व त्या रोपट्यासोबतचा (झाड) फोटो काढून ९४२३१७०८८५ या व्हाट्सऍप नंबरवर पाठवा.

अभियानात सहभागी होण्यासाठी खालील नियम व अटींची पूर्तता करावी लागणार आहे.१) रोपटं लावतांनाचा फोटो काढतांना उभा मोबाईल ठेवावा (धरावा),तारीख आणि वेळ फोटोत आवश्यक.२) संपूर्ण रोपटं (झाड) आणि आपला चेहरा दिसेल असा फोटो असावा.३) फोटो सोबत आपली माहिती पाठवावी – संपूर्ण नाव,गावाचे नाव,तालुक्याचे नाव,जिल्ह्याचे नाव,मोबाईल नंबर,व्हाट्सऍप नंबर,कोणते झाड लावले त्याचे नाव इत्यादी माहिती आवश्यक आहे.ही माहिती न पाठविल्यास फोटोचा विचार केला जाणार नाही.४) उत्कृष्ट आणि ओरिजिनल फोटो पाठविणाऱ्यांना “पर्यावरण गौरव प्रमाणपत्र” पाठविण्यात येईल.५) मागील वर्षांचा जुना फोटो,कुंडीतील रोपटं लावताना फोटो पाठवू नये,कुठलीही बनवेगिरी,खोटेपणा करू नये,केल्यास तो फोटो बाद करण्यात येईल.६) लावलेल्या रोपट्याचे (झाड) संगोपन करण्याची जबाबदारी घ्यावी लागेल.७) या अभियानाचा कालावधी फक्त दहा दिवसापूरताच मर्यादित आहे.

अभियानात सहभागी होण्याचा कालावधी शनिवार दिनांक ५ जून २०२१ पासून (वेळ स.८) ते सोमवार दिनांक १४ जून २०२१ (वेळ सायं.८) वाजेपर्यंत आहे.या अभियानाचा उद्देश कसल्याही प्रकारची प्रसिद्धी किंवा मोठेपणा मिळवायाचा नाही तर फक्त संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून “सामाजिक बांधिलकी” मानून तसेच “वृक्षारोपण – काळाची गरज” समजून झाडाबरोबरच पर्यावरण जनजागृती व संवर्धनाचा असून निसर्ग वाचवण्यासाठी एक निकोप अभियान घडवून आणून प्रत्येक माणसाच्या मनात झाडें रुजवण्याचा असल्यामुळे या अभियानात प्रत्येकाने सहभाग नोंदवावा असे आवाहन शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग (अपंग) संघटना जिल्हा शाखा बीड च्या वतीने करण्यात येत आहे.