उमरी येथील दिव्यांगाचे अमरण उपोषण यशस्वी

37

🔹प्रहार दिव्यांग संघटनेच्या लढ्यास आले यश

✒️चांदू आंबटवाड(नायगांव,तालुका प्रतिनिधी)मो:-9307896949

कुंटूर(दि.9जून):- (७ जुन )तहसील कार्यालय उमरी चे अकार्यक्षम तहसीलदार श्री भोथीकर साहेब व त्यांचे महसुल प्रशासनाच्या सुस्थ कारभारास कंटाळून प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष शेख मोहम्मद खाजामियाँ यांच्या सह संजय लक्ष्मण शिंदे, साहेबराव मारोती कस्तुरे, आनंदा किशन शिंदे, बंडू दशरथ पुप्पुलवाड व दिगंबर दत्ता सोनकांबळे या सहा दिव्यांग उपोषनकर्त्यांनी आपला आवाज बहीर्या व मुजोर प्रशासना पर्यंत पोहचवण्यासाठी अमरण उपोषनाचा मार्ग अवलंबला. मुळातच दोन्ही पाय ,हाथ,डोळे नसलेल्या दिव्यांगांना आपल्या न्याय हक्कासाठी अमरण उपोषना सारखा खरतड मार्ग अवलंबवा लागतो ही शरमेची बाब आहे.

त्या गरीब दिव्यांगांची मागणी तरी कोनती की, शासनाच्या जि आर प्रमाणे दिव्यांगांचा अंत्योदय यादी मध्ये सामावेश करावा, आणि संजय गांधी निराधार योजनेचे सहा सहा महिन्याला मिळणारे मानधन हे दरमहा द्यावे.पण तहसीलदार बोथीकर हे जाणून बुजून दिव्यांगांच्या फाईल्स आठ ते दहा महीन्यांपासुन रोखुन ठेवतात. अश्या कामचुकार तहसीलदारावर दप्तर दिरंगाई कायद्या अंतर्गत कार्यवाही व्हावी अशी मागणी सुज्ञ नागरिक करत आहेत.तसेच संजय गांधी निराधार योजना या विभागात काम करणारा लिपिक मुगटकर हे दिव्यांगांना व्यवस्थित माहिती देत नाहीत, पैशाची मागणी करतात, दिव्यांगांच्या फोनला प्रतिसाद देत नाहीत, सं गा यो च्या मिटींग दरमहा होत नाहीत, ईत्यादी प्रश्नांवर उपोषण पुकारले होते.

या उपोषणाचे आयोजन प्रहार दिव्यांग संघटनेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष श्री पंढरीनाथरावजी हुंडेकर पाटील यांनी केले होते. शेवटी तहसीलदार बोथीकर यांनी दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्याची तयारी दर्शवल्यानंतर अमरण उपोषनाची सांगता करण्यात आली.

यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष श्री. पंढरीनाथरावजी हुंडेकर साहेब, श्री. मारोतरावजी मंगरूळे साहेब नांदेड जिल्हा सचिव, चांदू आंबटवाड नांदेड जिल्हा सहसचिव, संगिताताई बामणे गोळेगावकर तालुका अध्यक्ष उमरी महिला आघाडी, केशरबाई शिंदे तालुका अध्यक्ष मुदखेड महिला आघाडी, साईनाथ बोईनवाड तालुका अध्यक्ष नायगाव, हनुमंत सिताफुले तालुका अध्यक्ष बिलोली, अनिल पाटील शेट्टे तालुका अध्यक्ष मुदखेड, माणिकराव जोंधळे, शंकर पाटील शिंदे, वामन चिंताके कुंटूर, शुभम बामणे, दिपक वाघमारे व ईतर दिव्यांग बांधव हजर होते.