उमरखेड येथे वंचित बहुजन आघाडी चे डफलीबजाव आंदोलन

28

🔹विविध मागण्यांसाठी उपविभागीय कार्यालयावर धडक !

✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका,प्रतिनिधी उमरखेड)

उमरखेड(दि.9जून);- टाळेबंदीमुळे तालुक्यातील सर्व साधारण जनतेचे जगणे अवघड झाल्यामुळे शासनाने सर्वसामान्यांना सर्वोतपरी मदत द्यावी यासाठी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने आज उमरखेड येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर डफलीबजाव आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनानंतर मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांना उपविभागीय अधिकारी मार्फत देण्यात आलेल्या निवेदनात सर्वसामान्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात मागण्या करण्यात आल्या असुन प्रामुख्याने यात वीजबिल माफ करणे, शासनाने पुढील दोन महिने अन्नधान्य मोफत देऊन किमान प्रति महिना पाच हजार रुपयांची संसारास मदत द्यावी.

शासनाने घरगुती व गाडीतील गॅसची दरवाढ केली व सबसिडी बंद केली ती दरवाढ कमी नव्हे तर पुढील तीन महिने गॅस मोफत देण्यात यावे, कामगार, मजूर, मध्यवर्गीय, शेतकरी यांना पेट्रोल-डिझेलची वाहन बंद ठेवून बाहेरील वाहनाने प्रवास करणे अवघड झाले आहे. त्यामुळे शासनाने सर्व कर रद्द करून पेट्रोल डिझेलचे दर तात्काळ कमी करावे, खाजगी वाहतूकदारांकडून सर्वसामान्यांची प्रवाशांची आर्थिक लूट तात्काळ थांबवावी.

फायनान्स कंपनी कडून होणारी हप्ता वसुली ही पुढील सहा महिनेपर्यंत ग्राहकांच्या सोयीने भरण्यास शिथिलता देण्यात यावी , शेतकऱ्यांना सरसकट खते व बियाणे मोफत द्यावे इत्यादी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडी चे तालुकाध्यक्ष संतोष जोगदंडे यांच्या नेत्रुत्वात जिल्हा महासचिव जॉन्टी उर्फ प्रशांत विणकरे, सभापती संबोधी गायकवाड, निकेश गाडगे, विनोद बरडे, अंबादास पाईकराव, अथर खतीब, सय्यद हुसेन मौलाना आणि तालुक्यातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.