गट विमा अपहार प्रकरणी तक्रार केली दाखल

30

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.10जून):-नगर परिषद मधील सफाई कामगारांचा वेतनातून प्रती महिना 15 रुपय कपात करण्यात येते .गंगाखेड नगर परिषद मध्ये ऐकून 85 सफाई कामगार आसून सदरील सफाई कामगारांचे ओक्टंबर 2018 पासून आज पर्यंत त्यांच्या वेतनातून 15 रुपये प्रत्येकी कपात करण्यात आलेली आहे आज पर्यंत सदर कार्यलयाच्या विमा त्यांच्या खात्यावर अद्याप जमा करण्यात आला नाही ओक्टंबर 2018 ते जून 2021 पर्यंत अनेक सफाई कामगार निवृत्त झाले आहेत तसेच काही कर्मचारी मयत झाले आहेत या मुळे कर्मचाऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे सफाई कामगाराच्या वेतनातून प्रत्येक महिन्याला गट विमा कपात केला.

असून नगर परिषद चे संबधित लेखापाल,रोखपाल, न. प.मुख्याधिकारी यानी गट विम्याचा अपहार केलेला दिसून येते जे कर्मचारी मयत झालेले व सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांना विम्याचे सवरक्षण मिळणार नाही या साठी सर्वस्वी लेखापाल,रोखपाल, न. प.मुख्याधिकारी हे जवबदार आहेत यानी मागील ओक्टंबर 2018 ते आज पर्यंत जून 2021पर्यंत गट विमा भरला गेला नाही या बाबत गेल्या पाच सहा महिन्यांपासून विचारणा केली असता लेखापाल,रोखपाल व आस्थापना विभाग एक मेकावर चाल ढकल करत आहेत.या बाबत गट विमा कर्यालयत संपर्क केला असता त्यांच्या कडून माहिती मिळाली की ओक्टंबर 2018 पासून गट विमाची रक्कम प्राप्त झाली नसल्या मुळे सेवा निवृती झालेल्या कर्मचाऱ्यांचे व मयत झलेल्या कर्मचारी याचा गट विम्याची रक्कम देण्यात आली नाही या बाबत गंगाखेड नगर परिषद कडून कुठलाही पत्र व्यवहार करण्यात आला नाही.

या मुळे कर्मचाऱ्यना गट विम्याचा लाभ मिळत नाही . गंगाखेड नगर परिषदच्या सफाई कामगारांचा गट विमा ,विमा कार्यालयात न भरल्यामुळे अपहार केल्याची तक्रार, मा. जिल्हा अधिकारी कार्यालय परभणी , मा.मुख्याधिकारी नगर परिषद गंगाखेड येथे अनिल साळवे यांनी दिनांक 10 जून रोजी केली आहे