वाढत्या महागाईमध्ये पेट्रोल, डिझेल, गॅस, तेल याच्या वाढीव दराच्या विरोधात- रिपब्लिकन सेनेने निषेध नोंदवला

24

✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका प्रतिनिधी,उमरखेड)

उमरखेड(दि.12जून):- राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज साहेब आंबेडकर यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रमुख मा.सागर डबरासे यांच्या नेतृत्वाखाली आणि तातेरावजी हनवते (यवतमाळ जिल्हाध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मा.तहसीलदार साहेब व विभागीय अधिकारी उमरखेड यांच्यामार्फत मा.पंतप्रधान,व केंद्रीय पेट्रोलियम मंत्री भारत सरकार यांना निवेदन देण्यात आले. या वेळेस केंद्र सरकारच्या विरोधात नारे देऊन आणि झेंडे फडकावून जाहीर निषेध नोंदविण्यात आला.

यावेळी कैलास पवार (जिल्हा उपाध्यक्ष) सुनिल पाटील चिंचोलकर (शहराध्यक्ष) देवानंद पाईकराव (तालुका प्रमुख) गौतम नवसागरे (तालुका उपप्रमुख) अरविंद धोंगडे साहेब (तालुका महासचिव) गुलाबराव वाघुळे (सदस्य) व उमरखेड महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष्या लिलाबाई लक्ष्मण हटकर, इंदुबाई उत्तमराव मनवर,उज्वलाबाई, रवी धुळे व इतर महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या तसेच साहेबराव कदम,कैलास खडसे, शुद्धोधन दिवेकर, गजानन दिवेकर, अंकुश दिवेकर, प्रकाश इंगोले, परमेश्वर काळे, प्रभाकर सावते इतर मान्यवर उपस्थित होते.