कोवीड जनजागृती नंतर धस पुत्रांचा मतदारसंघात सांत्वन दौरा

31

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.12जून):-गेल्या महिन्यात कोवीड विषयी जनजागृती करत नागरिकांना अॕन्टीजन टेस्टचे आवाहन करत नागरिकांना धीर देत रुग्णांना आधार देण्याचे काम आ.सुरेश धस यांच्यासह त्यांचे दोन्ही पुत्र जयदत्त धस,सागर धस यांनी केले.त्यानंतर आता आ.धस यांचे जयदत्त धस व सागर धस हे पुत्र पुन्हा एकदा मतदारसंघात गतवर्षात कोरोनाने आपले प्राण गमाविलेल्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन दौऱ्यास सुरुवात केली आहे.
आष्टी,पाटोदा,शिरुर तालुक्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला तेव्हा जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून जनसेवक आ. सुरेश धस व संपुर्ण धस कुटुंब गावागावात जनजागृती करून आधार देण्याचे काम करत होते.

कोवीड कालावधीत अनेकांनी आपले वडील,आई,बहीण,भाऊ व घरातील कर्ता पुरुष गमावला.त्यामुळे अशा कुटुंबियांची भेट घेऊन त्या कुटुंबाला मानसिक आधार देण्याचे काम आता आ.धस यांचे पुत्र जयदत्त धस व सागर धस करीत आहेत.मृत्यू झालेल्या कुटुंबाची आर्थिक बाजू,मुलांचे शिक्षण,कुटुंबाची जबाबदारी या सर्व गोष्टींचा विचार करून त्यांच्याशी चर्चा करून धस कुटुंबाच्या वतीने कुटुंबातील सदस्यांना प्रशासकीय,आर्थिक,शैक्षणिक व अन्य स्वरूपात काही मदत करता येईल का हे डोळ्यासमोर ठेवून तिन्ही तालुक्यात हा दौरा सुरू केला आहे.त्यामुळे साहजिकच जनजागृती दौऱ्यानंतर आ.धस यांच्या कुटुंबियांचा सांत्वन दौरा हा सर्वसामान्य नागरिकांना निश्चितपणे एकप्रकारे आधार आणि मानसिक बळ देणारा ठरत असल्याचे बोलले जात आहे.