डॉक्टर आर.जी.मोराळे यांचा प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने सत्कार

45

✒️चांदू आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी)मो:-9307896949

कुंटूर(दि.15जुन):-प्राथमिक आरोग्य केंद्र कुंटूर येथे नव्यानेच औरंगाबाद घाटी येथून बदली होऊन आलेले डॉ. आर. जी. मोराळे साहेबांचा प्रहार दिव्यांग संघटना नांदेड शाखा कुंटूरच्या वतीने सत्कार करून सन्मानीत करण्यात आले. कुंटूर येथे रुजू होताच त्यांनी आपल्या कार्याची चुणूक दाखवून दिली. पदभार स्विकारताच त्यांच्यावर दिव्यांगांच्या लसीकरणाचे आव्हानात्मक काम त्यांनी आपल्या गोड स्वभावाने सहज पार पाडू शकले.

त्यांच्या कार्याची दखल घेऊन प्रहार दिव्यांग संघटनेचे नांदेड जिल्हा सहसचिव चांदू आंबटवाड व त्यांचे सर्व दिव्यांग बांधवांनी मिळून त्यांच्या कार्यशैलीवर प्रभावित होऊन त्यांचा शाँल,हार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या छोटेखानी कार्यक्रमास नांदेड जिल्हा सहसचिव चांदू आंबटवाड, मल्हारी महादाळे, वामन चिंताके, गोविंद होळकर, गोविंद महादाळे, तेजेराव पिंपळे, अशोक वाघमारे, देविदास झुंजारे, देऊबाई देवदे, पिराबाई वाघमारे, ऊज्वला गठ्ठावार, काशीनाथ नागेश्वर, साहेबराव झुंजारे व ईतर दिव्यांग बांधव हजर होते.