बीड जिल्ह्याच्या दबंग खासदार प्रितम ताई मुंडे यांना केंद्रात मंत्रीपद द्या-सतिष ढाकणे

33

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)

बीड(दि.17जून):- जिल्ह्याच्या दबंग खासदार डॉ प्रितम ताई मुंडे यांना केंद्रात मंत्रीपद द्या अशी मागणी भाजपा गेवराई चे चिटणीस सतिष ढाकणे यांनी केली आहे.बीड जिल्ह्यातील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील जनसामान्यांच्या प्रश्नांना केंद्रीय पातळीवर वाचा फोडणाऱ्या युवा खासदार म्हणून प्रितम ताई मुंडे यांची ओळख महाराष्ट्र राज्याबरोबर संपूर्ण देशात झाली आहे.या पार्श्वभूमीवर गेवराई चे भारतीय जनता पार्टी चे चिटणीस सतिष ढाकणे यांनी प्रितम ताई मुंडे यांना केंद्रात मंत्रीपद द्या अशी मागणी केली आहे.

पुढे बोलताना ते असे म्हणाले की,
बीड जिल्ह्याच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील व विकास कामे खेचून आणणे व लोकहिताचे निर्णय घेणे यासाठी ताईंनी कसोशीने प्रयत्न केले.डॉ प्रीतमताई यांच्या नावा समोरील गोपीनाथ मुंडे नावाच वलय कार्यकर्त्यांच्या अपेक्षा,जिल्ह्याचा विकास यामध्ये ताई कुठेही आणि कोणत्याही परिस्थितीत कमी पडल्या नाहीत.

विश्वविक्रमी महाआरोग्य शिबिर, परळी-बीड-नगर रेल्वेसाठी सरकारच्या माध्यमातून मंजूर करून आणलेला भरघोस निधी, बीडच्या जनतेसाठी मंजूर करून आणलेले पासपोर्ट ऑफिस,देशभर गाजलेला पिक विमा पॅटर्न, कोरोनाच्या महाभयंकर परिस्थितीत जिल्ह्यातील प्रत्येक कोविड केअर सेंटरला भेट दिली व रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी करून रुग्णांना दिलासा दिला.शेतकरी,मराठा आरक्षण, विद्यार्थी,ओबीसी जनगणनेचा प्रश्न तसेच विविध जनहिताच्या मुद्दयांवर संसदेत ताईंनी प्रभावीपणे प्रश्न मांडले. संसदपटू भाषणाने व अभ्यासु मुद्यांनी एक युवा सांसद म्हणून ताईंनी वेगळीच छाप पाडली.

मा.नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू आहेत. महाराष्ट्रातून मा.डाॅ. प्रीतमताई मुंडे यांचा समावेश करून वंचित पीडित शोषित आणि ऊसतोड कामगारांच्या आवाजाला धार द्यावीव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य न्याय द्यावा.

• जनतेच्या प्रश्‍नांची असलेली जाण व सोडवण्याची तळमळ,
• जनतेचा असलेला विश्वास,
• 24×7 असलेला जनसंपर्क,
• उच्चशिक्षित नेतृत्व,
• शांत आणि संयमीपणा
या खासदार ताईंच्या जमेच्या बाजू आहेत. त्यामुळे,दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना नक्कीच या गोष्टींचा विचार करावा.

लोककल्याणकारी नेतृत्वाला व मुंडे साहेबांच्या संसदेतील वारसाला केंद्रीय नेतृत्वाने संधी द्यावी. देश तसेच महाराष्ट्राच्या जनतेच्या हितांची कामे, प्रलंबित प्रश्न मा. प्रितमताई या नक्कीच पूर्ण करतील.