पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ केंद्र सरकारने त्वरित मागे घ्यावी

30

🔹पंतप्रधान व पेट्रोलियम मंत्री यांना युवा विदर्भ आघाडी ब्रह्मपुरी यांचे निवेदन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपूरी(दि.17जून):- विदर्भ राज्य आंदोलन समिती व युवा विदर्भ आघाडी ब्रह्मपुरी यांच्या वतीने आज दिनांक 17 जून ला पेट्रोल डिझेल गॅस व इतर वस्तूंच्या प्रचंड जीवघेणा दरवाढीविरोधात ब्रह्मपुरी तालुका स्तरावर युवा विदर्भ आघाडी यांच्या माध्यमातून पंतप्रधान व पेट्रोलियम मंत्री यांना उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना ब्रह्मपुरी युवा आघाडीच्या माध्यमातून पेट्रोल डिझेल गॅस व इतर प्रचंड झालेली दरवाढ त्वरीत कमी करण्यासाठी आज निवेदन देण्यात आले. निदर्शने करण्यात आली. कोरोना च्या माहामारी मध्ये जनतेचे जगणे कठीण झाले रोजगार व्यापार ,शेती , व्यवहार ठप्प झाले आहे.

अशा वेळेस ही सतत दरवाढ करून केंद्र सरकार जनतेची लूटमार करीत आहे.आम्ही निवडून आलो तर पेट्रोल – डिझेल गॅस सहीत महागाई कमी करू असे आश्वासन भाजपा सरकारने केली होते. महागाई साठी काँग्रेसवर टीका करणारे भाजपा नेते मात्र केंद्रात भाजप सरकार बसल्यावर पेट्रोल डिझेल गॅस चे भाव दुपटीने वाढले आहे.

या भाववाढीचा युवा विदर्भ आघाडी ब्रह्मपुरी निषेध करते व त्वरित ही भाववाढ मागे घ्या. असे केंद्र सरकारला पंतप्रधान व धर्मेंद्र प्रधान पेट्रोलियम मंत्री यांना निवेदनाद्वारे आव्हान करते अन्यथा विदर्भ राज्य आंदोलन समिती व युवा विदर्भ आघाडी ब्रह्मपुरी आंदोलन तीव्र स्वरूपात करेल.यावेळी युवा विदर्भ आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुदाम राठोड, फकीरा बारसागडे, साहील मेश्राम, स्वप्निल गायकवाड, साजन पिल्लेवान, पंकज मेश्राम, आदर्श मेश्राम, सोनू गणवीर, आदीची उपस्थिती होती.