राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त आभिवादन

34

🔸शिवानंद पांचाळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात जिजाऊ माॅंसाहेब यांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांना आभिवादन करण्यात आले

✒️नायगांव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नायगाव(दि.18जून):-१७ जून १६७४… म्हणजेच स्वराज्यजननी जिजाऊंचा पुण्यतिथी दिन राजमाता जिजाऊ शिवबांना छत्रपती पदापर्यंत घेऊन जाणाऱ्या एक धैर्यवान माता अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीवर मात करत, मुघल सत्तेला हिंदुस्थानातून उलथवून लावण्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या महान माता म्हणजे माँसाहेब जिजाऊ. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी छत्रपती शिवरायांना राजकारणाबरोबरच नीती, चातुर्य, व्यवहार, संघटन, मुत्सद्देगिरी अशा अनेक गुणांचे बाळकडू जिजाऊंनी दिले आणि म्हणूनच शिवरायांसारखे महाप्रतापी तसेच शंभूराजांसारखे रणझुंजार दोन छत्रपती घडू शकले.

स्वराज्यजननी जिजाऊंच्या कार्याला आणि त्यांच्या त्यागांना पुण्यतिथी निमित्ताने अखिल ,भारतिय ओबीसी, महासंघाच्या वतीने मराठवाडा उपाध्याक्ष – शिवानंद पांचाळ यांच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ माॅंसाहेब यांच्या प्रतिमेला मोठ्या श्रध्देने पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पवित्र स्मृतिंना कोटि कोटि वंदन करण्यात आले, यावेळी विश्वनाथ पाटील खराडे , शिवानंद पांचाळ नायगांवकर ,सचिन सुरेशराव फुलारी ,डेबुजी फोर्स चे नांदेड जिल्हाध्यक्ष बाळू भाऊ ईबितवार ईकळीकर अदी ओबीसी कार्यकर्ते उपस्तित होते.