भामरागड येथे आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी घेतली आढावा बैठक

30

🔸रेंगाळत असलेले कामे त्वरित करण्याचे दिले कडक निर्देश

✒️राहुल डांगे(विशेष प्रतिनिधी)

भामरागड(दि.18जून):- आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी गुरुवारी भामरागड तालुक्याचा दौरा करून तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतले व तालुक्यात रखडलेले व रेंगाळत असलेले विकास कामे त्वरित करण्याचे कडक निर्देश दिले.येथील तहसील कार्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत प्रामुख्याने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम, जिल्हा परिषद सदस्य ग्यानकुमारी कौशिक, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्षा शाहीन भाभी हकीम, तहसीलदार अनमोल कांबळे आदी उपस्थित होते.

आढावा बैठकीत सर्वप्रथम आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी, तालुका आरोग्य अधिकारी मिलिंद मेश्राम यांच्याकडून कोरोना व लसीकरणा संबंधी माहिती जाणून घेतले. पुढे कोरोनाचा धोका वाढू नये यासाठी कटाक्षाने काळजी घेण्याचे आवाहन केले.सध्या शेतीचे हंगाम सुरू होणार असल्याने बी-बियाणे, खते, शेतीविषयक साहित्य सामुग्री संबंधी कृषी अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केले.

तसेच संजय गांधी, श्रावण बाळ योजना, रेशन, ठक्कर बाप्पा योजना, घरकुल, सिमेंट रोड, वीज, आरोग्य, शिक्षण तसेच अंतर्गत रस्ते आणि अन्य विविध विकासात्मक कामांचेही आढावा घेऊन रेंगाळत असलेले कामे त्वरित पूर्ण करण्याचे कडक निर्देश देऊन पुढील कामासाठी यावेळी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुढील विकासात्मक कामांसाठीही नियोजन करण्याचे सूचना केले.
आढावा बैठकीत यावेळी संवर्ग विकास अधिकारी राहुल चव्हाण, पोलीस निरीक्षक किरण रासकर, तालुका आरोग्य अधिकारी मिलिंद मेश्राम, बबलू भैय्या हकीम, रामजी भांडेकर, सबर बेग मोगल आदी उपस्थित होते.