पाकिस्तानची पुन्हा नाचक्की

28

पाकिस्तान हीच दहशतवादाची जननी आहे हे आता लपून राहिले नाही. भारतात विशेषतः जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करून भारतात अस्थिरता माजवण्याच्या पाकिस्तानचा डाव उघड झाला आहे. पाकिस्तान हाच दहशतवाद्यांना आर्थिक आणि लष्करी साहाय्य पुरवतो. पाकिस्तानच्या हद्दीत दहशतवाद्यांचे अड्डे आहेत हे भारताने जगाला ओरडून सांगितले तेंव्हा जगाने त्यातही अमेरिकेने त्याकडे दुर्लक्ष केले पण ९/११ चा दहशतवादी ओसामा बिन लादेन याला पाकिस्तानने आश्रय दिला असून तो पाकिस्तानमधील ओबटाबाद येथे लपून बसला आहे हे जेंव्हा अमेरिकेला समजले तेंव्हा त्यांचे डोळे उघडले. अमेरिकेचे विख्यात पत्रकार डॅनियल पर्ल यांची हत्या देखील पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनीच केली हे जेंव्हा अमेरिकेला समजले तेंव्हा मात्र अमेरिकेने पाकिस्तानला सज्जड दम दिला तेंव्हापासून अमेरिका आणि पाकिस्तानचे संबंध बिघडले आहे.

पाकिस्तान दहशतवाद्यांना मदत करणे थांबवत नाही हे लक्षात आल्यावर फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सने त्यांना ग्रे लिस्टमध्ये टाकले. फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स ही विकसनशील देशांना अर्थपुरवठा करणारी अमेरिकेतील एक संघटना आहे. फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सने ग्रे लिस्टमध्ये टाकल्यानंतर पाकिस्तानला होणारा अर्थपुरवठा कमी झाला त्यामुळे आधीच डबघाईला आलेली पाकिस्तानची अर्थव्यवस्था आणखी डबघाईला आली परिणामी इम्रान खान यांची डोकेदुखी वाढली. वास्तविक पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये नाही ब्लॅक लिस्टमध्ये टाकायला हवे होते भारताने तशी मागणीही केली होती. पाकिस्तानने ग्रे लिस्टमधून बाहेर काढण्याची विनंती फायनान्शियल ऍक्शन फोर्सला केली पण त्यांनी ती फेटाळून लावली. पाकिस्तानची मागणी फेटाळून लावल्याने इम्रान खान यांना मोठा धक्का बसला असून पाकिस्तानची जगभरात नाचक्की झाली आहे.

फायनान्शियल ऍक्शन फोर्सने पाकिस्तानला ग्रे लिस्टमधून हटविण्यास स्पष्ट नकार देऊन पाकिस्तानला तीन सूचना केल्या आहेत
१) दहशतवाद्यांना आणि त्यांच्या संघटनांना अर्थसाहाय्य प्रकरणाची चौकशी इम्रान खान सरकारने करावी.
२) सर्व दहशतवाद्यांच्या आर्थिक व्यवहारावर आणलेले निर्बंध आणि त्याचे काटेकोरपणे होणाऱ्या कारवाईचे पुरावे सादर करावेत.
३) पाकिस्तान सरकारने दाहशतवाद्यांवर कडक कारवाई करावी.
या तीन सूचनांचे पालन न केल्यास पाकिस्तानची वर्णी ग्रे लिस्टमधून ब्लॅक लिस्टमध्ये केली जाईल अशी तंबीही फायनान्शियल ऍक्शन फोर्सने इम्रान खान यांना दिली आहे. पाकिस्तानला ममिळालेल्या या तंबीने इम्रान खान चांगलेच अडचणीत आले आहे कारण त्यांनी स्वतः उभा दहशतवादाचा राक्षस हा आता भस्मासुर बनला आहे. तो इम्रान खान यांना दाद देईल असे वाटत नाही आणि इम्रान खान यांच्यामध्येही दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची ताकद नाही त्यामुळे दहशतवादी कारवाया कमी होणार नाहीत परिणामी पाकिस्तानचा ब्लॅक लिस्टमध्ये समावेश होईल आणि तसे झाले तरी पाकिस्तानची चोहोबाजूंनी आर्थिक कोंडी होईल.

✒️लेखक:-श्याम ठाणेदार(दौंड,जिल्हा पुणे)मो:-९९२२५४६२९५